Horoscope 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार नवग्रहातील ग्रह एका ठराविक वेळेनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतात. शनि ग्रह देखील राशी आणि नक्षत्र परिवर्तन करतो.
शनी ग्रहाला न्याय देवता आणि कर्मफळ दाता म्हणून ओळखले जाते. इतर राशींच्या तुलनेत शनी ग्रह फारच संथ गतीने राशी परिवर्तन करत असतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी शनी ग्रहाला तब्बल अडीच वर्षांचा काळ लागतो हे विशेष.
दरम्यान पुढल्या वर्षी शनी ग्रहाचे राशी परिवर्तन होणार आहे. मार्च 2025 मध्ये शनी ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये शनी ग्रहाने कुंभ राशी मध्ये प्रवेश केला होता.
आता मार्च 2025 मध्ये शनी ग्रह कुंभ राशी मधून मीन राशी मध्ये जाणार आहे. दरम्यान जेव्हा शनी ग्रहाचे राशी परिवर्तन होईल अर्थातच शनी ग्रहाचे गोचर होईल तेव्हा या घटनेचा राशीचक्रातील काही लोकांवर याचा सकारात्मक प्रभाव पाहायला मिळणार आहे.
दरम्यान आज आपण शनि देवाच्या राशी परिवर्तनाने कोणकोणत्या राशीच्या लोकांना अच्छे दिन येतील या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मकर : या राशीच्या लोकांसाठी 2025 हे वर्ष खास ठरणार आहे. शनि देवाचे राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. मकर राशीच्या लोकांना शनि देवाच्या कृपेने चांगला पैसा मिळणार आहे यामुळे यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.
नवीन संधी मिळणार आहे मात्र कामानिमित्ताने दूरवरचे प्रवास करावे लागतील. ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल अशा लोकांचे कर्ज फिटणार आहे. अडकलेले पैसे सुद्धा मिळणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णकाळ राहणार आहे. नवीन इन्कम सोर्स मिळतील. करिअरच्या दृष्टिकोनातून हा काळ फायद्याचा ठरेल. नवीन नोकरीचे योग देखील आहेत तसेच प्रमोशन आणि पगारवाढीसारख्या गुड न्यूज देखील पुढल्या वर्षी मिळू शकतात.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी देखील पुढील वर्ष विशेष खास ठरणार आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून वृश्चिक राशीच्या लोकांना पुढल्या वर्षी चांगले सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत.
व्यवसायिकांना देखील पुढल्या वर्षी चांगला लाभ होणार आहे. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील प्रमोशन सारख्या गोष्टी घडतील. या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि समाजात मानसन्मान देखील वाढणार आहे. आर्थिक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये अचानक धनलाभ होणार असे दिसते. अडकलेले पैसे परत मिळतील, नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनची भेट मिळणार आहे.
या लोकांची इमेज बिल्डिंग चांगची होणार आहे. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल.
वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. एकंदरीत कर्क राशीचे अच्छे दिन सुरू होणार आहेत.