Under 5 Lakhs Car:- भारतीय कार बाजाराचा अभ्यास केला तर यामध्ये तुम्हाला अनेक चांगल्या कंपन्यांच्या बजेट कार देखील पाहायला मिळतात. तर अगदी काही लाखो ते कोटी रुपयांपर्यंतच्या कार देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये प्रत्येक ग्राहक म्हणजे ज्याला कार खरेदी करायचा आहे तो स्वतःचा आर्थिक बजेट आणि त्या बजेटमध्ये नवीन कार घेण्याची अपेक्षा किंवा त्या कारमध्ये अपेक्षित असलेले वैशिष्ट्ये पाहूनच कार खरेदी करतो.
तसं पाहायला गेले तर कार घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते.परंतु आपला बजेट पाहूनच कार घेण्याचे निश्चित केले जाते. तुम्हाला देखील जर बजेटमध्ये कार घ्यायची असेल व तुमचा बजेट जर पाच ते साडेपाच लाख रुपये पर्यंत असेल तर बाजारामध्ये अनेक चांगले फीचर्स असलेल्या कार उपलब्ध आहेत व त्यांच्या किमती या पाच लाखापेक्षा कमी आहेत. त्यामुळे कमीत कमी किमतीत तुम्ही कारचे स्वप्न पूर्ण करू शकता.
या आहेत भारतातील बेस्ट बजेट कार्स
1- मारुती सुझुकी अल्टो 800 आणि अल्टो के 10- मारुती सुझुकीच्या अल्टो व्हेरियंट खूप स्वस्त आणि लोकप्रिय असे मॉडेल असून भारतीय कार बाजारपेठेमध्ये अल्टो नावाच्या दोन कार विकल्या जातात. यामध्ये मारुती अल्टो 800 आणि मारुती अल्टो के 10 यांचा समावेश आहे.
या दोन्ही कारमध्ये अल्टो के 10 अधिक पावरफुल इंजिन आणि अधिक अपडेट अशा फीचर सोबत येते. अल्टो 800 पेक्षा ही थोडी महाग आहे. विशेष म्हणजे या दोन्ही कारमध्ये सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध असून यामध्ये अल्टो 800 ची एक्स शोरूम किंमत बघितली तर ते तीन लाख 54 हजार रुपये आहे तर अल्टो के 10 ची एक्स शोरूम किंमत तीन लाख 99 हजार रुपये आहे.
2- रेनॉल्ट क्विड- ही रेनॉल्ट कंपनीची देशातील एंट्री लेवल कार असून या कारला कंपनीने दोन पेट्रोल इंजिनचा पर्याय दिलेला आहे. यामध्ये 0.8- लीटर पेट्रोल आणि 1.0- लिटर पेट्रोल इंजिनचा पर्याय देण्यात आलेला असून जे अनुक्रमे 54 पीएस पावर आणि 72 एनएमचा टॉर्क आणि 68 पीएस पावर आणि 91 एनएमचा टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम असून यामध्ये पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स,
तसेच एक लिटर इंजिन सह स्वयंचलित ट्रान्समिशन पर्याय देण्यात आला आहे. तसेच इलेक्ट्रिक ओआरव्हीएम, ड्युअल फ्रंट एअर बॅग, अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, आठ इंच टचस्क्रीन एन्फोटेनमेंट सिस्टम, कीलेस एन्ट्री आणि मागील पार्किंग सेन्सर यासारखे महत्त्वाचे वैशिष्ट्ये दिले असून या कारची प्रारंभिक एक्स शोरूम किंमत चार लाख 64 हजार रुपये इतकी आहे.
3- मारुती इको- ही सर्वात स्वस्त सात सीटर कार म्हणून ओळखली जाते. या कारमध्ये 1.2- लिटर एनए पेट्रोल इंजन देण्यात आले असून जे 73 पीएस पावर आणि 98 एनएम टॉर्क जनरेट करते.
या कारमध्ये सीएनजीचा पर्याय देखील देण्यात आला असून हे सीएनजी मोडवर 63 पीएस पावर जनरेट करते. सीएनजी वर ही कार 20 किलोमीटर पर केजी मायलेज देते. ही कार साधारणपणे पाच आणि सात सीटर मध्ये येते. या कारचे प्रारंभिक एक्स शोरूम किंमत चार लाख 63 हजार रुपये आहे.