Maruti New Generation Dezire:- मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य कार उत्पादक कंपनी असून आतापर्यंत या कंपनीने उत्कृष्ट अशी कार मॉडेल्स बाजारपेठेमध्ये लॉन्च केलेले आहेत व भारतीय ग्राहकांचा जर विचार केला तर मारुती सुझुकीच्या कार प्रामुख्याने खूप लोकप्रिय असल्याचे आपल्याला दिसून येते.
मारुती सुझुकीच्या अल्टो पासून तर अनेक कार आज भारतीय बाजारपेठेवर अधिराज्य गाजवताना आपल्याला दिसून येतात.त्यातल्या त्यात ग्रामीण भागापासून तर शहरी भागातील ग्राहकांपर्यंत लोकप्रिय असलेली मारुती सुझुकीची डिझायर ही कार देखील गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय ग्राहकांमध्ये अतिशय पसंतीची कार आहे.
यात मारुती सुझुकी डिझायरची न्यू जनरेशन म्हणजेच नवीन पिढीचे मॉडेल मारुती सुझुकी कंपनीने नुकतेच लॉन्च केले असून ही कार आता पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलीकडेच ग्लोबल NCAP कारच्या क्रॅश टेस्टिंगमध्ये या कारला पाच स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले आहे व कोणत्याही एजन्सी कडून पाच स्टार सुरक्षा रेटिंग मिळवणारी ही मारुतीची पहिली कार ठरली आहे व इतकेच नाही तर भारतीय कार बाजारपेठेतील पहिली पाच स्टार रेटिंग मिळवलेली ही पहिली सेडान कार देखील आहे.
कशी आहे मारुती सुझुकीची न्यू जनरेशन डिझायर?
मारुती सुझुकीने भारतात सर्वात जास्त विक्री होणारी सेडान डिझायरचे नवीन पिढीचे मॉडेल लॉन्च केले असून ही.कार आता पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही पर्यायामध्ये सादर करण्यात आली आहे.
नुकत्याच घेण्यात आलेल्या ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश टेस्टमध्ये या कारला पाच स्टार सुरक्षा रेटिंग मिळाले असून
ही मारुती सुझुकीची पाच स्टार रेटिंग मिळवणारी पहिली कार आणि भारतीय बाजारपेठेतील पाच स्टार मिळवलेली पहिली सेडान कार ठरली आहे.
या कारची रचना पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने करण्यात आली असून त्यामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ, मानक म्हणून सहा एअर बॅग्स आणि अनेक सेगमेंट फर्स्ट फीचर्ससह ही कार सादर करण्यात आलेली आहे. बाजारामध्ये ही कार LXI, VXI, ZXI आणि ZXI+ अशा चार प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
किती आहे या कारची किंमत?
या कारच्या अपडेटेड मॉडेलची एक्स शोरूम सुरुवातीची किंमत 6 लाख 79 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. जी ZXI पेट्रोल, सीएनजीच्या टॉप व्हेरियंटमध्ये नऊ लाख 84 हजार रुपयापर्यंत जाते. ही किंमत 2024 या वर्षाच्या शेवटपर्यंत वैध असणार आहे.
तसेच ही कार सबस्क्रिप्शनच्या आधारावर मिळू शकते व 18248 रुपये प्रति महिना ईएमआय पासून देखील तुम्ही तिला घेऊ शकतात. यामध्ये इन्शुरन्स तसेच मेन्टेनन्स, रजिस्ट्रेशन इत्यादी खर्चाचा समावेश आहे.