भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या ? कोणत्या बँकेत जमा केलेला पैसा कधीच बुडणार नाही ? RBI ने दिले उत्तर !

आरबीआय ने भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या आहेत याविषयी माहिती दिली आहे. आरबीआय ने जाहीर केलेल्या यादीत एक सरकारी बँक आणि दोन खाजगी बँक आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या 3 बँका देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.

Tejas B Shelar
Published:
Banking News

Banking News : तुमचेही देशातील कुठल्या ना कुठल्या बँकेत खाते असेल नाही का? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. आपण सर्वजण आपल्या मेहनतीचा पैसा बँकेत ठेवतो. पगारदार लोकांचा पगार तर थेट बँक खात्यातचं जमा होतो. अलीकडे कॅशलेस व्यवहाराला चालना मिळाली आहे. कॅशलेस व्यवहारासाठी इंटरनेट बँकिंग, यूपीआयचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय.

ऑनलाइन पेमेंट मुळे पैशांचे व्यवहार आधीच्या तुलनेत सोपे झाले आहेत. मात्र ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी बँकेत अकाउंट असणे आवश्यक असते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या आहेत ? दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे.

आरबीआय ने भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका कोणत्या आहेत याविषयी माहिती दिली आहे. आरबीआय ने जाहीर केलेल्या यादीत एक सरकारी बँक आणि दोन खाजगी बँक आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक या 3 बँका देशातील सर्वाधिक सुरक्षित बँका म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की देशाच्या मध्यवर्ती बँकेने अर्थातच आरबीआयने नुकतीच डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इंपोर्टेंट बँकांची यादी जाहीर केली. याचं डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पोर्टेड बँकांमध्ये एसबीआय एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या तीन बँकांचा समावेश झाला आहे. खरेतर, या ३ बँकांचा गेल्या वर्षी देखील या यादीत समावेश झाला होता.

यंदा पुन्हा एकदा या यादीत या तिन्ही बँकांची वर्णी लागली आहे. आरबीआयच्या डी सिब्स लिस्टमध्ये एखाद्या बँकेचा समावेश असणे हे संबंधिक बँकांसाठी फार महत्त्वाचे ठरते. या यादीत ज्या बँका येतात त्या बँकांनाच देशातील सर्वात सुरक्षित बँका म्हणून ओळखले जाते. अशा बँका देशातील आर्थिक व्यवस्थेसाठी फार महत्त्वाच्या असतात.

कारण या बँका बुडाल्या तर त्याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे या बँका इतक्या महत्त्वाच्या असतात की त्यांना काही झाले किंवा त्यांच्यावर कोणत्याही अडचणी आल्या तर सरकार स्वत: त्या वाचवण्याचा प्रयत्न करत असते.

एकंदरीत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया देशातील सर्वात मोठी खाजगी बँक अर्थातच एचडीएफसी आणि दुसऱ्या क्रमांकाची देशातील सर्वात मोठे खाजगी बँक अर्थातच आयसीआयसीआय या तीन बँका भारतातील सर्वाधिक सुरक्षित बँका आहेत.

या बँका कधीच बोलू शकत नाहीत अर्थातच या बँकांमधील ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. अशा बँका जर बुडाल्या तर अर्थव्यवस्थेचे नुकसान होण्याची भीती असते, यामुळे या बँका बुडू नयेत यासाठी सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करते.

जर या बँका बुडण्याच्या स्थितीत आल्या तर सरकार स्वतः या बँका वाचवण्यासाठी पुढे सरसावते. अशा परिस्थिती जर तुमचेही या बँकांमध्ये अकाउंट असेल आणि तुम्हीही या बँकांमध्ये तुमचे पैसे ठेवलेले असतील तर तुम्ही बिनधास्त राहा या बँकेत जमा असणारे पैसे कधीच बुडणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe