श्रीगोंदा :- ढवळगाव ते बेलवंडीफाटा रस्त्यावर खर्च केलेले ३ कोटी ८० लाख खड्ड्यात गेले आहेत. डांबरीकरणास चार महिने उलटत नाही तोच ठिकठिकाणी मोठ्ठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे, तर काही ठिकाणी डांबरी रस्ता आहे की नाही अशी शंका येते.
बऱ्याच ठिकाणी दीड मीटर रुंदीच्या साईडपट्ट्या केलेल्या नाहीत. बेलवंडीफाटा ते ढवळगाव रस्ता पुढे बेलवंडी रेल्वे स्टेशन व अष्टविनायकांपैकी सिद्धटेककडे जात असल्याने रस्त्यावर सतत वाहतूक असते. परिसरात दोन सहकारी व एक खासगी साखर कारखाना आहे.
कारखाने चालू झाले की, रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढते. अनेक ठिकाणी तुटफूट होते. पाऊस नाही, कारखान्यांचा हंगाम सुरू नसताना रस्ता खराब झाला आहे. रस्ता खचल्यामुळे गाडी चालवताना खड्डे दिसत नाहीत. अचानक समोर खड्डा आल्यानंतर वाहकाचे नियंत्रण जाऊन अपघात होतात.
आमदार राहुल जगताप यांनी या रस्त्यासाठी निधी दिला. ठेकेदाराने कामाचा दर्जा चांगला न राखल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत. सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी अतुल लोखंडे यांनी केली.
- कमी पगारात देखील पैसे वाचवा आणि वाढवा! ‘या’ टिप्स फॉलो करा,होईल फायदा
- भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचा शेअर देईल प्रचंड पैसा! मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने जारी केला रिपोर्ट
- लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरेल रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर! तज्ञांनी दिले संकेत
- 10 रुपयांची ‘ही’ नोट बनवेल तुम्हाला 3 लाख रुपयांचा मालक! जाणून घ्या कसे होईल शक्य?
- रिटायरमेंटनंतर तुम्हाला तुमच्या पीएफ मधून किती मिळेल पेन्शन? जाणून घ्या कसे होते कॅल्क्युलेशन?