महिन्याला 5 किंवा 10 हजार रुपयाची एसआयपी दहा वर्षापर्यंत केली तर किती मिळतील तुम्हाला पैसे? वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

एसआयपीतील गुंतवणुकीतून तुम्हाला जर चांगला परतावा अपेक्षित असेल तर त्याकरिता तुम्हाला दीर्घ कालावधीपर्यंत गुंतवणूक करणे गरजेचे असते व यामुळे तुम्हाला चक्रवाढीचा देखील फायदा मिळतो व तुम्हाला मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो.

Ajay Patil
Published:
sip

Investment In SIP:- सध्या जर आपण गुंतवणुकीचे पर्याय बघितले तर यामध्ये एसआयपी अर्थात सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनला खूप मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे.एसआयपीमध्ये दिवसेंदिवस गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढत असून दीर्घ कालावधीसाठी जर गुंतवणूक केली तर खूप चांगल्या प्रकारे परतावा देण्याची क्षमता एसआयपीत असल्याकारणाने गुंतवणूक आपल्याला वाढताना दिसून येत आहे.

एसआयपीतील गुंतवणुकीतून तुम्हाला जर चांगला परतावा अपेक्षित असेल तर त्याकरिता तुम्हाला दीर्घ कालावधीपर्यंत गुंतवणूक करणे गरजेचे असते व यामुळे तुम्हाला चक्रवाढीचा देखील फायदा मिळतो व तुम्हाला मोठ्या प्रमाणावर परतावा मिळतो.

समजा तुम्हाला देखील एसआयपी सुरू करायची आहे व त्याकरिता तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजाराची किंवा दहा हजार रुपयांची एसआयपी करणार आहात व तीही दहा वर्षाच्या कालावधी करिता तर या कालावधीत तुम्ही किती पैसे जमा करू शकाल

किंवा तुम्हाला दहा वर्षानंतर किती पैसे मिळतील? याची देखील माहिती तुम्हाला असणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात आपण यासंबंधीचे कॅल्क्युलेशन जरा व्यवस्थित पद्धतीने बघू.

महिन्याला 5 हजार रुपयाची एसआयपी 10 वर्षासाठी केली तर किती पैसे मिळतील?
तुम्ही महिन्याला जी ही रक्कम एसआयपी मध्ये गुंतवत आहात त्या माध्यमातून तुम्हाला किती परतावा मिळू शकतो याचा अंदाजा तुम्ही एसआयपी कॅल्क्युलेटर वापरून लावू शकतात.

यामध्ये जर तुम्ही एसबीआय एसआयपी कॅल्क्युलेटर नुसार बघितले तर तुम्ही जर दहा वर्षांकरिता 12% परतावा गृहीत पकडला व त्यानुसार पाच हजार रुपये महिन्याला गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक सहा लाख रुपये होते.

12 टक्के दराने तुम्हाला त्यावर पाच लाख 61 हजार 695 रुपये परतावा मिळेल. म्हणजेच तुमचे एकूण जमा सहा लाख आणि दहा वर्षात त्यावर मिळणारा परतावा हा पाच लाख 61 हजार 695 असे म्हणून तुम्हाला दहा वर्षानंतर अकरा लाख 61 हजार 695 रुपये मिळतात. समजा 12% ने नाही तर हा परतावा तुम्हाला वार्षिक 15% पर्यंत मिळाला तर ही रक्कम जवळपास 13 लाख 93 हजार 286 रुपये इतके होते.

महिन्याला दहा हजार रुपयांची गुंतवणूक दहा वर्षांसाठी केली तर…
समजा 5000 ऐवजी जर तुम्ही महिन्याला दहा हजार रुपयांची एसआयपी दहा वर्षांकरिता करायचे ठरवले व त्यावर तुम्हाला 12 टक्क्यांच्या आधारे परतावा मिळाला तर तुम्हाला एकूण 23 लाख 23 हजार 391 रुपये या माध्यमातून मिळू शकतात.यामध्ये मिळणारी रक्कम थोडी कमी जास्त होऊ शकते.

परंतु दीर्घ काळामध्ये जर तुम्ही गुंतवणूक केली तर नक्कीच मुदत ठेव म्हणजेच एफडी पेक्षा म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये तुम्हाला जास्त परतावा मिळतो. थोडीशी जोखीम घेण्याची तुमची तयारी असेल तर म्युच्युअल फंड एसआयपी हा गुंतवणुकीचा उत्तम असा पर्याय आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe