Tourist Places Near By Mumbai:- वातावरणामध्ये आता सुखद असा गारवा जाणवायला लागला असून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी पर्यंत थंडीचे प्रमाण वाढून सगळीकडे गुलाबी थंडी पसरेल व अशा वातावरणामध्ये अल्हाददायकपणा देखील या निमित्ताने आपल्याला जाणवायला लागतो.
अशावेळी ज्या लोकांना पर्यटनाची म्हणजेच फिरायची हौस असते ते व्यक्ती कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जायचं प्लान करतात. यामध्ये जर आपण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचा विचार केला तर प्रामुख्याने मुंबई फिरायला जाणाऱ्यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर असल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे तुम्ही जर मुंबई बाहेरील असाल व तुम्हाला जर मुंबई फिरायला जायचे असेल तर मुंबई सोबत तुम्ही मुंबईच्या 80 ते 100 किलोमीटर अंतरावर असलेली काही पर्यटन स्थळे पाहणे खूप गरजेचे आहे.
कारण जेव्हा तुम्ही ही स्थळे पहाल तेव्हा तुम्हाला फिरण्याची मजा काय असते हे कळेल व जीवनामध्ये कायम आठवणीत राहतील असे क्षण तुम्हाला अनुभवता येतील.
त्यामुळे मुंबई फिरून झाल्यावर तुम्ही मुंबई शहराच्या शंभर किलोमीटरच्या परिघात असणारी ही ठिकाणे पाहणे खूप गरजेचे आहे व त्या ठिकाणाबद्दलचीच माहिती आपण घेऊ.
मुंबई पासून शंभर किलोमीटर अंतरावर असणारी प्रमुख पर्यटन स्थळे
1- कर्जत- रायगड जिल्ह्यात असलेले हे ठिकाण खूपच सुंदर आणि मनमोहक पर्यटन स्थळ म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. उल्हास नदीच्या तीरावर वसलेले हे सुंदर ठिकाण एकदा जर बघितले तर कायम त्या ठिकाणी जाण्याची इच्छा होते. या ठिकाणचे शांत आणि मनमोहक वातावरणाने व्यक्ती हरकून जाते.
जे निसर्गप्रेमी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. कर्जतला असलेले रिव्हर राफ्टिंग, कर्जत ट्रेकिंग आणि कॅम्पिंग साठी देखील कर्जत ओळखले जाते.
कर्जतला गेल्यावर तुम्ही कोंडाणा लेणी तसेच कोथळीगड किल्ला आणि भोर घाट यासारखे सुंदर दृश्य पाहू शकतात. तुम्हाला जर ठाण्यावरून कर्जतला जायचे असेल तर तुम्हाला 68 किमीचे अंतर पार करावे लागते.
2- मनोरी बीच- तुम्ही मुंबईमध्ये ठाण्यात असाल व तुम्हाला जर ठाण्याच्या आजूबाजूला एखादा सुंदर आणि लोकप्रिय असलेल्या समुद्रकिनाऱ्याला भेट द्यायची असेल तर तुमच्याकरिता मनोरी बीच हा एक सुंदर ऑप्शन ठरू शकतो. या बीच वरील शांततेचे वातावरण आणि सुंदर अशा उसळणाऱ्या समुद्राच्या लाटा तुमच्या मनाला भारावून टाकतात.
या बीचवरून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनोविहंगम दृश्य पाहू शकतात. यामुळे या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते.
या ठिकाणी तुम्ही स्कुबा डायव्हिंगचा मोठ्या प्रमाणावर आनंद घेऊ शकतात. ठाण्याला जर तुम्ही गेला तर ठाण्यापासून जवळ असलेले अक्सा बीच, उत्तर आणि गोराई बीच यासारखी उत्तन बीच देखील पाहू शकता. ठाणे ते मनोरे बीच हे अंतर सुमारे 35 किलोमीटर आहे.
3- अलिबाग- रायगड जिल्ह्यामधील प्रमुख असलेले ठिकाण म्हणजेच अलिबाग होय व विकेंड करीता हे एक उत्तम ठिकाण म्हणून ओळखले जाते. समुद्रकिनाऱ्यांनी वेढलेले हे सुंदर शहर असून याला मिनी गोवा देखील बरेच जण म्हणतात. या ठिकाणी असलेला मुरुड समुद्रकिनारा पर्यटकांसाठी खूप आकर्षणाचे केंद्र असून हा किनारा प्रामुख्याने पांढऱ्या वाळू करिता ओळखला जातो.
अलिबागला गेल्यानंतर तुम्ही मुरुड बीच पाहू शकतात व त्यासोबत अलिबाग व वर्सोली बीच देखील पाहू शकता.या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद मोठ्या प्रमाणावर घेता येतो व कुलाबा किल्ला आणि श्री पद्माक्षी रेणुका मंदिर देखील तुम्हाला पाहता येते. तुम्हाला जर ठाण्यावरून जायचे असेल तर 98 किलोमीटरचे अंतर पार करून तुम्ही अलिबागला पोहोचतात.
4- माथेरान- ठाण्याच्या आजूबाजूला भेट देण्यासारखे अजून एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सगळ्यांना माहिती असलेले माथेरान होय. महाराष्ट्रातील लोकप्रिय आणि निसर्ग सौंदर्याने नटलेले हिल स्टेशन असून या ठिकाणी असलेले सुंदर पर्वत तसेच घनदाट जंगल व धबधबे यांचे मनोहारी दृश्य पाहण्यासारखे आहे.
तसेच पॅनोरमा पॉईंट, इको पॉईंट आणि शिवाजीच्या पायऱ्या यासारखे अद्भुत ठिकाणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनचा आनंद मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतात व दऱ्या खोऱ्यांमध्ये देखील फिरू शकतात. ठाण्यावरून जायचे असेल तर तुम्हाला 90 किमीचे अंतर पार करून माथेरानला पोहोचता येते.