लाडक्या बहिणीनी युतीच्या मागे उभे रहावे- भाग्यश्री ढाकणे

महिलांचा सन्मान करणारे महायुती हे सरकार असुन लाडक्या बहिणींनी या सरकारला साथ दयावी विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये दावे दाखल करत आहे याकडे महिलांना त्यांना थरादेवु नये असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या राज्य उपाध्यक्ष, भाग्यश्री ढाकणे यांनी टाकळी मानुर, ता.पाथर्डी, येथे केले.

Ajay Patil
Published:
monica rajle

महायुतीच्या काळामध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातुन मतदार संघात राज्यात सर्वांत जास्त 1लाख 30 हजार महिलांना लाभ आमदार मोनिकाराजळे यांच्या माध्यमातुन मिळाला असुन यापुढील काळामध्ये त्यामध्ये वाढ होणार आहे, महिलांचा सन्मान करणारे महायुती हे सरकार असुन लाडक्या बहिणींनी या सरकारला साथ दयावी विरोधक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये दावे दाखल करत आहे याकडे महिलांना त्यांना थरादेवु नये असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या राज्य उपाध्यक्ष, भाग्यश्री ढाकणे यांनी टाकळी मानुर, ता.पाथर्डी, येथे केले.

महायुती सरकार सर्वसामान्य जनतेला योजना देत आहे तर आघाडी सरकारकडुन त्या बंद करण्यासाठी कोर्टामध्ये धाव घेतली जात आहे मग सर्वसामान्य जनतेचे कोण हे यावरुन लक्षात येत.शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना सुरु केले वृध्दांसाठी वयोश्री, महिलांना एस टी भाडयात 50 टक्के सुट शेतकरी सन्मान योजना या सारख्या वैयक्तिक लाभाच्या योजना सुरु केल्या असुन त्यामधुन डिबीटीच्या माध्यमातुन गोर गरीब जनतेला प्रत्यक्ष फायदा होतांना दिसुन येत आहे,

महिला स्वावलंबी होतांना दिसत आहे हे महायुती सरकारचे यश असुन राज्यामध्ये महायुतीचे सरकार येणार हे निश्चत असुन आपल्या मतदार संघामध्ये देखील महायुतीच्या उमदेवार मोनिका राजळे या मोठया मताधिक्याने विजय होणार असल्याचे चित्र दिसुन येत आहे राज्याचे राजकारणामध्ये त्यांना भविष्यात मोठया संधी असल्याचे दिसुन येत आहे

त्यामुळे महिला आमदार म्हणुन आपण सर्व बहिणींनी त्यांच्या मागे खंबीर पणे उभेराहीन त्यांना निवडून पाठवून देण्याचे आव्हाण केल.यावेळी तालुक्यातील महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचाराच्या संवाद दौऱ्यावेळी बडे बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भिमराव फुंदे,भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ.मृत्युंजय गर्जे,

माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, खरेदी विक्री संघाचे संचालक भगवानराव आव्हाड,आजीनाथ पाराजी बडे, भिमराव बडे, प्रभू बडे, सूर्यभान बडे, अर्जुन बडे,विष्णू बडे, रावसाहेब बडे,बबन बडे, आजीनाथ शिवराम बडे, आश्रुबा बडे,शिवनाथ खेडकर, आजीनाथ सीताराम बडे, रामदास आंधळे, सतीश शिरसाट, अंकुशराव कासुळे, यांच्यासह महायुती घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe