भावांनो! फक्त 6 हजार रुपयापेक्षा कमी किमतीत मिळतील उत्तम असे स्मार्टफोन; Amazon आणि flipkart वर आहे खरेदीची नामी संधी

तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या कमी किमतींमध्ये चांगले स्मार्टफोन सध्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला उत्कृष्ट असा कॅमेरा तसेच उत्तम प्रोसेसर आणि डिस्प्ले देखील चांगल्या पद्धतीचा मिळेल.विशेष म्हणजे बॅटरी देखील पावरफुल अशा देण्यात आलेल्या आहेत.

Ajay Patil
Published:
budget smartphone

Budget Smartphone:- तुम्हाला जर स्वस्तात मस्त असा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल व अशा स्मार्टफोनच्या शोधात जर तुम्ही असाल तर ॲमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्ट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून उत्तम असे स्मार्टफोन अगदी कमीत कमी किमतीमध्ये मिळवू शकतात.

तुमचा विश्वास बसणार नाही इतक्या कमी किमतींमध्ये चांगले स्मार्टफोन सध्या या दोन्ही प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला उत्कृष्ट असा कॅमेरा तसेच उत्तम प्रोसेसर आणि डिस्प्ले देखील चांगल्या पद्धतीचा मिळेल.विशेष म्हणजे बॅटरी देखील पावरफुल अशा देण्यात आलेल्या आहेत.

त्यामुळे असे कोणते स्मार्टफोन आहेत की ते तुम्ही फक्त 6 हजार रुपयापेक्षा कमी किमतीत ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरून खरेदी करू शकतात त्यांची माहिती आपण या लेखात बघू.

6 हजार रुपयेपेक्षा कमी किमतीत मिळतील हे स्मार्टफोन

1- रेडमी a2- रेडमीचा हा स्मार्टफोन दोन जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला असून या फोनची किंमत ॲमेझॉन वर फक्त 5669 रुपये आहे. जर या स्मार्टफोन मधील फिचर्स बघितले तर तुम्हाला दोन जीबी व्हर्च्युअल रॅम पण मिळते. अशा पद्धतीने या स्मार्टफोनची एकूण रॅम ही चार जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक हिलीओ G36 चिपसेट देण्यात आला असून या स्मार्टफोनचा डिस्प्ले 400 nits च्या पीक ब्राईटनेस पातळीसह येतो.

उत्तम फोटोग्राफी करिता या फोनमध्ये कंपनीने उत्कृष्ट असा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला असून पाच मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. तसेच रेडमीच्या या फोनमधील बॅटरी बघितली तर ती 5000mAh क्षमतेची पावरफुल अशी बॅटरी आहे.

2- आयटेल औरा 05i(itel Aura 05i)- हा देखील एक उत्तम स्मार्टफोन असून यामध्ये दोन जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले असून या फोनची सेलमध्ये किंमत पाच हजार 749 रुपये इतकी असून यामध्ये उत्कृष्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये Unisoc SC9863A1 प्रोसेसर देण्यात आला असून 6.6 इंचाचा एचडी डिस्प्ले देखील तुम्हाला मिळतो. फोटोग्राफी करिता कंपनीने या फोनमध्ये पाच मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला असून सेल्फी करिता दोन मेगापिक्सल पर्यंत कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी दिली आहे.

3- इन्फीनिक्स स्मार्ट 8 HD- या स्मार्टफोनमध्ये तीन जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले असून या स्मार्टफोनची किंमत फ्लिपकार्टवर 6699 रुपये इतकी आहे. बँक ऑफरमध्ये हा फोन 6000 रुपयांपेक्षा कमी किमतीत देखील तुम्हाला मिळू शकतो.

या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला असून Unisoc T606 प्रोसेसर वर हा काम करतो. या फोनच्या बॅक साईडला फोटोग्राफी करिता एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देण्यात आले आहेत.

यामध्ये तेरा मेगापिक्सलचा मुख्य लेन्ससह AI लेन्सचा समावेश आहे. तसेच उत्तम सेल्फी करिता आठ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील तुम्हाला यामध्ये मिळतो. या स्मार्टफोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची अशी पावरफूल बॅटरी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe