ग्राहकांना नुसते वेड लावले आहे ‘या’ एसयूव्ही कारने! 6 लाख रुपयापेक्षा आहे कमी किंमत; काय आहे बरं खास या कारमध्ये?

आघाडीचे कार उत्पादक कंपनी म्हणून लोकप्रिय असलेली निसान या कंपनीने गेल्या महिन्यात त्यांच्या कार विक्रीचा डेटा जारी केला व त्यामध्ये या कंपनीची निसान मॅग्नाइट ही कार सर्वाधिक विक्री होणारे कार ठरली आहे. या कालावधीमध्ये निसान मॅग्नाइट या कारचे तब्बल 3119 युनिटची विक्री झालेली आहे.

Published on -

Nissan Magnite SUV Car:- भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांनी उत्कृष्ट अशा कार उत्पादित केलेले आहेत. त्यातील बऱ्याच कार या ग्राहकांच्या प्रचंड प्रमाणात पसंतीस उतरल्या असून यामध्ये आपल्याला टाटा पंच किंवा मारुती स्विफ्ट डिझायर सारख्या कारचे उदाहरण घेता येईल.

यासोबतच आघाडीचे कार उत्पादक कंपनी म्हणून लोकप्रिय असलेली निसान या कंपनीने गेल्या महिन्यात त्यांच्या कार विक्रीचा डेटा जारी केला व त्यामध्ये या कंपनीची निसान मॅग्नाइट ही कार सर्वाधिक विक्री होणारे कार ठरली आहे. या कालावधीमध्ये निसान मॅग्नाइट या कारचे तब्बल 3119 युनिटची विक्री झालेली आहे.

नुकतेच निसान मॅग्नाइट या कारचे अपडेटेड व्हर्जन देखील लाँच करण्यात आलेले असून त्याला देखील ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नेमकी ही कार ग्राहकांमध्ये इतकी लोकप्रिय का झाली आहे याबद्दलचीच माहिती आपण या लेखात बघू.

कसे आहे निसान मॅग्नाइट कारचे इंजिन?
या कारमध्ये कंपनीने 1.0- लिटर नॅचरल अस्पिरेटेड पेट्रोल इंजिन दिले असून जे ७२ बीएचपीची कमाल पावर आणि 96 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच दुसरे 1.0- लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असून ते 100 बीएचपी पावर आणि 160 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यासाठी सक्षम असून

या दोन्हीं इंजिनला पाच स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स देण्यात आला आहे. ही कार ग्राहकांना प्रतिलिटर 20 km पर्यंत मायलेज देते असा कंपनीचा दावा आहे. बाजारपेठेमध्ये या कंपनीची स्पर्धा प्रामुख्याने ह्युंदाई वेन्यू, किया सोनेट यासारख्या एसयूव्ही कारशी आहे.

इतर वैशिष्ट्ये कोणती आहेत?
जर कारमधील महत्त्वाची इतर वैशिष्ट्ये बघितली तर या कारच्या केबिनमध्ये आठ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि सात इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे.

याशिवायया कारच्या इंटेरियर म्हणजेच आतल्या भागात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले कनेक्टिव्हिटी यासारखी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निसान मॅग्नाइट कारमध्ये सहा एअर बॅग सारखे सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले.

किती आहे निसान मॅग्नाइट कारची किंमत?
भारतीय कार बाजारपेठेमध्ये निसान मॅग्नाइट या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत पाच लाख 99 हजार रुपयांपासून ते 11 लाख 50 हजार रुपये पर्यंत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!