Ahilyanagar News:- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी जोरदार प्रचार केला असून मतदार संघातील अनेक गावांमध्ये त्यांनी प्रचार सभांचे आयोजन केले होते व या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधण्यावर त्यांनी मोठ्या प्रमाणावर भर दिला.
अगदी याच पद्धतीने काल लोणी व्यंकटनाथ या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते व त्यावेळी त्यांनी डिंभे- माणिक डोह बोगद्याच्या प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,आमदार बबनराव पाचपुते यांनी कुकडी, घोड कालव्या करिता समान न्याय भावनेने काम केले असून कुकडी लाभक्षेत्रातील जे काही गाव आहेत त्यांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यासाठी उपयुक्त असलेला डिंभे माणिकडोह बोगदा होणे खूपच गरजेचे असल्याने हा प्रश्न अगोदर मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन पाचपुते यांनी केले.
काय म्हणाले विक्रम पाचपुते?
यावेळी बोलताना विक्रम पाचपुते म्हणाले की, लोणी व्यंकटनाथ तसेच बेलवंडी, येळपणे चिंभळा गावच्या सीमेवरील एमआयडीसी साठी लागणारी जागा निश्चित करण्यात आली असून या जागेवर लवकरच महायुतीचे सरकार काम सुरू करणार आहे.
तसेच लोणी व्यंकटनाथ परिसरामध्ये तीस कोटींची विकास कामे मार्गी लावले आहेत तसेच राजकीय जोडी बाजूला ठेवून लोणी व्यंकटनाथ मधील नागरिकांनी पाठिंबा देण्याचे धोरण घेतले. त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन गाव पुढे कसे नेता येईल याकरिता काम करणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी लोणी व्यंकटनाथ येथील नागरिकांना दिली.
यावेळी भरत काकडे तसेच विलास मस्के, नामदेव जठार, हनुमंत मगर, शिवाजी लोंढे, सुहास काकडे,बंडू काकडे तसेच अजित काकडे,बाळासाहेब पवार, अंबादास मडके इत्यादी सह नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.