उगवत्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका ! खा. नीलेश लंके यांचे विरोधकांवर शरसंधान

विधानसभा निवडणूक सुरू झाल्यानंतर काही उमेदवार मतदारांपुढे येत आहेत. हे उमेदवार भुछत्रासारखे आहेत. निवडणूकीनंतर ते पुन्हा मावळणार आहेत. ते परत येणार नाहीत. मी उगवता सुर्य आहे. उगवत्या सुर्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका.महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ अळकुटी गणाच्या वतीने अळकुटी येथे रविवारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

Published on -

विधानसभा निवडणूक सुरू झाल्यानंतर काही उमेदवार मतदारांपुढे येत आहेत. हे उमेदवार भुछत्रासारखे आहेत. निवडणूकीनंतर ते पुन्हा मावळणार आहेत. ते परत येणार नाहीत. मी उगवता सुर्य आहे. उगवत्या सुर्याच्या मागे या, मावळत्यांच्या नादी लागू नका.
महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ अळकुटी गणाच्या वतीने अळकुटी येथे रविवारी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महानगर बँक व जिल्हा बँकेच्या संचालक गीतांजली शेळके, गितांजली शेळके, बहुजन रयत परिषदेच्या अध्यक्षा ॲड. कोमल साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सिताराम काकडे,

डॉ. भास्कर शिरोळे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका खिलारी, बाबाजी भंडारी, कुंदनमल साखला, बाळासाहेब पुंडे, सखाराम उजघरे, संतोष काटे, किरण डेरे, सुवर्णा धाडगे, गुंडा भोसले, अनिल आवारी, धोंडीभाउ झिंजाड, किरण पानमंद, श्रीकांत डेरे, निवृत्ती गाडगे यांच्यासह अळकुटी गणातील असंख्य नागरीक यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, निवडणूकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांची प्रचाराची धुरा अतिशय समर्थपणे जबाबदारीने पार पाडली. दोन दिवस राहीले आहेत. आपणच उमेदवार म्हणून काम करा. मागील पाच वर्षात किमान दोन हजार कोटी रूपयांचा निधी आपण आणला. काही कामे प्रलंबित आहेत.

ती कामे माग लावण्यात येतील. म्हस्केवाडी रस्त्याचे काम प्रलंबित आहे. पहिल्याच टप्प्यात हे काम माग लावले जाईल. गोसावी माता सभामंडपासाठी पाडळीआळेच्या नागरीकांनी मागणी केली आहे, त्यांच्या अपेक्षापेक्षाही अधिक चांगला सभामंडप देऊ, तुम्ही तो पाहत राहाल. पाडळीआळे येथील मोरया गृपने राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांचे पक्षात स्वागत करतो.

रेनवडी, रांधे, दरोडी, वडनेरचे एकही काम मागे ठेवणार नाही शिरापुरचेही एकही काम मागे ठेवणर नाही. सर्वच गावांमधील कामे माग लावली जातील कोणीही काळजी करू नये. कळस गावाने एकमुखी निर्णय घेत विरोधी उमेदवाराचे बुथ न लावण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तेथील विकास कामांकडेही लक्ष द्यावे लागेल असे खा. लंके यांनी सांगितले.

पिटीशन दाखल केले तरी पाच वर्षे मीच खासदार !

कॅमेरा बंद केल्याबाबत बंडू शिरोळे यांनी माहीती दिल्यानंतर त्यांच्या नादी लागू नका. लोकसभेच्या निवडणूकीनंतर कोर्टात हेलपाटे मारावे लागले. या निवडणूकीच्या अनुषंगाने समोरच्या गडयाने तेराशे पानांचे पिटीशन दाखल केले आहे. कितीही पिटीशन दाखल केले तरी काही होणार नाही. पाच वर्षासाठी मीच खासदार असणार आहे. त्यामुळे कॅमेरा बंद केला तरी तिकडे दुर्लक्ष करण्यासाठी मी सांगितले कारण कोर्ट कचेरीची आपल्याला माहीती नाही.

खा. नीलेश लंके
लोकसभा सदस्य

दिलेल्या संधीचे सोने केले

तुम्ही निश्चितपणे चांगले प्रेम केले. पाच वर्षापूव तुम्ही मला संधी दिली, त्या संधीचे मी सोने केले. लोकसभा निवडणूकीतही तुम्ही तालुक्याची अस्मिता दाखविण्याचे काम केले. मला लोकसभेत जाण्याची संधी मिळाल्याचे खा. लंके म्हणाले.

निवडणूकीनंतर एक खिडकी योजना

निवडणूकीनंतर आपण मतदारसंघात एक खिडकी योजना राबविणार आहोत. जसे कोणताही आजार असेल तर त्यावर एकच डॉक्टर उपचार करू शकतो. कोणतेही काम असेल तर एकाच खिडकीत जायचे. सतरा दरवाजे फिरण्यापेक्षा एका दारात गेलेले कधीही चांगले. सगळया अडचणी एकाच माणसाकडून दुर होणार आहेत. इतरांच्या नादी लागू नका. जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा. इकडे तिकडे लक्ष विचलीत होउ देउ नका. दोन दिवस राहीले आहेत. तुम्ही तुमचे गाव सांभाळा. आपल्या गावात जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल त्यासाठी प्रयत्न करा.

खा. नीलेश लंके

गीतांजली ताईंचा उत्साह वाढला

गेली पंधरा वीस दिवस सर्व जण प्रचाराच्या धावपळीत आहेत. जीएस महानगर बँकेच्या संचालक गीतांजली शेळके या ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी मतदारसंघात येतात. उन्हाची पर्वा न करता प्रचारात सहभागी होतात. आता महिला राज असल्याने गीतांजलीताई यांचा उत्साह अधिक वाढला असल्याचे खा. नीलेश लंके म्हणाले.

महिलांनीच ही निवडणूक हाती घेतली

या निवडणूकीत मला जाणवले की उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही २५ ते ३० हजार महिलांनी हजेरी लावली होती. प्रचारातही महिला दिसत असून या निवडणूकीत पुरूषांचा ताण बराच कमी झाला. कोणत्याही व्यासपीठावर गेले की तिथे महिलांनी ताबा घेतल्याचे चित्र संपूर्ण निवडणूकीदरम्यान पहावयास मिळाले.

महिलांनी निवडणूक हाती घेतल्यावर काय होते हे सर्वांना माहीती आहे. उमेदवार विजयी होणार ही काळया दगडावरची पांढरी रेघ आहे. राज्यातही महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा खा. नीलेश लंके यांनी केला.

खासदार आमदारापेक्षा मोठा !

सभेमध्ये शेवटचे भाषण करण्यासाठी खा.नीलेश लंके हे उभे राहिल्यानंतर उमेदवारालाही बोलायचे होते पण वेळ कमी असल्यामुळे मी उभा राहीलो, तसाही मी खासदार आहे ! असे त्यांनी सांगताच सभेत एकच हशा पिकला. कोणी म्हणायला नको की मी मोठा किंवा मी छोटा आहे ! खासदार आमदारापेक्षा मोठाच असतो! अशी मिश्किली करीत खा. लंके यांनी वातावरण हलके फुलके केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!