जनतेची दिशाभुल करणा-यांना जागा दाखवा-मोनिका राजळे; शेवगावमध्ये मोनिका राजळे यांच्या रॅलीला व सांगता सभेस उत्फुर्त प्रतिसाद

गेल्या पन्नास वर्षातील विकासाचे प्रश्न दहा वर्षाच्या काळामध्ये ख-या अर्थाने मार्गी लावण्याचे काम केले आहे, पाणी प्रश्न कायमचा सोडविला आहे काम सुरु आहे, मतदार संघ विभाजन होणार नाही,ताजनापुर लिप्टचे काम वेगाने पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असुन गेल्या दहा वर्षाच्याकाळात मतदार संघात एकही दिवस न आलेले प्रतिनिधी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत.

Ajay Patil
Published:
monica rajle

गेल्या पन्नास वर्षातील विकासाचे प्रश्न दहा वर्षाच्या काळामध्ये ख-या अर्थाने मार्गी लावण्याचे काम केले आहे, पाणी प्रश्न कायमचा सोडविला आहे काम सुरु आहे, मतदार संघ विभाजन होणार नाही,ताजनापुर लिप्टचे काम वेगाने पुर्ण करण्याचा प्रयत्न केला असुन गेल्या दहा वर्षाच्याकाळात मतदार संघात एकही दिवस न आलेले प्रतिनिधी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत.

माझया कार्यकाळात झालेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, पंचायत समितीच्या माध्यमातुन एकही भरीव काम आजतागायत झाले नाही केंद्रा मध्ये सत्ता असणा-या युती सरकारला मतदान करा, जनतेची दिशाभुल करणा-यां अपक्ष जागा दाखवा असे आवाहन मोनिका राजळे यांनी शेवगाव येथे प्रचारांच्या सांगता सभेमध्ये केले.

यावेळी शहराती आंबेडकर चौकापासुन शिवाजी पुतळयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होत. विरोधक जे प्रश्न आज मांडत आहेत हे मतदारसंघामध्ये ते असतांना देखील होते त्यांनी त्यावर काहीच केले नाही युती सरकारच्या काळात शेवगाव शहर आणि तालुक्यातील गावांमध्ये विकासाची कामे काय असतात हे दाखवुन दिले आहेत.

जायकवाडी मधुन शेवगाव शहरासाठी पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन मंजुर असुन काम सुरु आहे, प्रशासनाच्या सोयीसाठी तहसिल कार्यालयाची भव्य इमारत उभी केली आहे. गेल्या अनेक दिवसापासुन प्रलंबीत असलेल्या ताजनापुर लिप्ट चा प्रश्न मार्गी लावला आहे.

दुष्काळामध्ये व कोरोना काळात जनतेच्या सोबत कायम लढले असुन शेवगाव तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुखात सतत सहभागी झाले आहे व लोकप्रतिनिधी काय असततो याची जाणीव करुन दिली असुन उभ राहु की नको, राहु तर कुठल्या पक्षाकडून हेच माहिती नसणा-या विरोधकांकडे विकासाचा काहीच अजेंडा नाही फक्त खोटया बातम्या पसरविण्याचे त्यांनी काम केले असुन जनतेला भावनिक बनविण्याचे काम करत आहेत

परंतु यांनी यांच्याकडे सत्ता असतांना कुठलेही कामे केलेली नाही युती सरकारकडून दिडशे कोटीचा निधी कारखान्याला घेऊन पुन्हा त्यांच्याच उमेदवाराच्या विरोधात उभा राहण्याचे काम त्यांनी केले आहे.सर्वच गावांमध्ये विकास कामांना निधी दिला असुन रस्त्यांची कामे मोठयाप्रमाणात करता आली त्यांमुळे तालुक्याचे दळणवळण व आर्थिक उलाढाल वाढली याचे मला समाधान असुन भविष्यात अनेक मोठी कामे करावयाची आहेत केंद्रामध्ये मा.नरेंद्र मोदी यांचे भाक्कम सरकार असुन राज्यात देखील ते येणार आहे

मतदार संघाचा विकास होण्यासाठी अपक्ष आमदार गरजेचा नसतो तर ज्या पक्षाचे सरकार आहे त्या पक्षाचा लोकप्रतिनिधी असले तर मोठयाप्रमाणात निधी मतदार संघामध्ये आणता येतो हे आपण गेल्या पाच वर्षामध्ये अनुभवले आहे. विरोधक अपक्ष उभे असुन त्यांना कुठलाही आधार नाही ते निवडुन येण्याची शक्यता देखील कमीच असते त्यांमुळे सुज्ञ मतदारांनी मतदार संघातील विकासासाठी केंद्रातील राज्यातील सरकार असलेल्या योग्य उमेदवाराची निवड करण्याची गरज आहे.

युती सरकार हे एक प्रकारचे विश्वासू सरकार असुन राज्याकडून तसेच केंद्राकडून मोठा निधी मिळवला जाऊ शकतो व मतदार संघाचा कायापालट करण्यासाठी त्याचा उपयोग होणार असुन आपल्यामताचे महत्व ओळखुन मतदान करा भावनीक आणि भुलथापा देणा-यांना त्यांची जागा दाखवा असे आव्हाण यावेळे मतदारांना त्यांनी केले. यावेळी अशाक आहुजा, बापुसाहेब पाटेकर,बापुसाहेब भोसले,

अशितोष डहाळे, कचरु चोथे,भिमराज सागडे, ह.भ.प चंद्रशेखर मुरदारे, केशव आंधळे, संजय खेडकर,शोभा अकोलकर, आशा गरड,सागर फडके, सुरेश नेमाने, किरण काथवटे, उमेश भालसिंग, गणेश रांधवणे, गेणश कोरडे डॉ.निरज लांडे, राहुल बंब, महेश फलके, रवि सुरवसे, नितीन दहिवाळकर, बापुसाहेब धनवटे, अशोक ससाणे, कैलास सोनवणे, सुरेश नेमाणे आदिंसह मोठयासंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe