ताबडतोब वजन कमी करायचे असेल तर चालताना पाळा 6-6-6 चा नियम! मिळतील अनेक आरोग्यदायी फायदे आणि रहाल फिट

जर तुम्हाला फायदा मिळवायचा असेल तर चालण्याच्या देखील योग्य पद्धतीचा अवलंब करणे तुम्हाला गरजेचे आहे. या अनुषंगाने जर चालण्यासंबंधीचा महत्त्वाचा नियम 6-6-6 पाहिला तर तो खूप महत्त्वाचा नियम असून खूप साधा आणि सरळ आहे.परंतु तुम्हाला यामुळे फिटनेसचे अनेक महत्त्वपूर्ण असे फायदे मिळतात.

Published on -

Walking Rule:- धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या अनेक समस्या कित्येक जणांना उद्भवतात. यामुळे प्रामुख्याने वजन वाढण्याच्या समस्येने कित्येक जणांना त्रस्त करून सोडले आहे व अशा वाढत्या वजनामुळे हृदयरोग तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारख्या आजारांना निमंत्रण मिळते.

त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. परंतु अपेक्षित असा परिणाम मात्र दिसून येत नाही. यामध्ये चालणे तसेच व्यायाम, डाइट इत्यादी अनेक उपाय योजनांचा समावेश आपल्याला करता येईल. परंतु यामध्ये चालणे हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे

. परंतु योग्य पद्धतीने जर तुम्हाला फायदा मिळवायचा असेल तर चालण्याच्या देखील योग्य पद्धतीचा अवलंब करणे तुम्हाला गरजेचे आहे. या अनुषंगाने जर चालण्यासंबंधीचा महत्त्वाचा नियम 6-6-6 पाहिला तर तो खूप महत्त्वाचा नियम असून खूप साधा आणि सरळ आहे.परंतु तुम्हाला यामुळे फिटनेसचे अनेक महत्त्वपूर्ण असे फायदे मिळतात. त्यामुळे नेमका हा नियम काय आहे? याबद्दलची माहिती बघू.

6-6-6 चा पहिला नियम
यामध्ये जर आपण हा पहिला नियम बघितला तर यात दररोज सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता साठ मिनिटे चालणे, त्यानंतर सहा मिनिटे वॉर्म अप आणि सहा मिनिटे कुलडाऊन अशा पद्धतीचा हा पहिला नियम आहे.

याचा फायदा असा होतो की दररोज सकाळी सहा वाजता चालल्याने फुफुसांना ताजी हवा मिळते व त्यामुळे मेटाबोलिझम सुधारते. रक्ताभिसरण व ऊर्जा देखील वाढण्यास मदत होते.

तसेच संध्याकाळी सहा वाजता अगदी दोन ते पाच मिनिटांचा वॉक केला तरी देखील तुम्ही शांत होतात व चिंता कमी होऊन रात्र तुम्हाला खूप मस्तपैकी झोप लागते.

6-6-6 चा चालण्याचा दुसरा नियम
दुसऱ्या नियमामध्ये सहा मिनिटे मध्यम गतीने, सहा मिनिटे एकदम जलद गतीने आणि नंतर पुन्हा सहा मिनिटे हळू गतीने चालण्याचा समावेश होतो. अशाप्रकारे चालण्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीराचा मेटाबोलिझम वाढतो.

हा नियम तुम्ही फक्त 18 मिनिटात फॉलो करू शकतात.जे लोक कामामुळे किंवा वेळेअभावी चालणे टाळतात त्यांच्यासाठी हा दुसरा नियम खूप उपयुक्त आहे.

6-6-6 च्या वॉकिंग नियमामुळे काय मिळतात आरोग्याला फायदे?

1- हृदय राहते निरोगी- चालण्याच्या या नियमामुळे हृदयाचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू राहते व वेगवेगळ्या गतीमध्ये चालल्याने ज्या गतीने हृदय धडधडते त्याला एकसंधता मिळते. जलद चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते तर मध्यम गतीने चालल्याने हृदयाला आराम देखील मिळतो व हृदयविकाराचा धोका कमी होतो.

2- कॅलरी बर्न करण्यासाठी फायद्याचे- दुसऱ्या नियमांमध्ये जे आपण पाहिले तो जर नियम फॉलो केला तर यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते. 6-6-6 च्या नियमामुळे चालताना शरीराच्या स्नायूंवर ताण येतो आणि फॅट बर्निंग प्रक्रियेला देखील वेग मिळतो.त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा एक सोपा आणि प्रभावशाली असा उपाय आहे.

3- मानसिक आरोग्यासाठी फायद्याचा- चालणे हा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील उत्तम व्यायाम असून या नियमाच्या वेगवान आणि स्थिर क्रमामुळे मेंदूला आराम मिळतो आणि स्ट्रेस हार्मोन्स कमी व्हायला मदत होते. अशाप्रकारे नियमितपणे हा नियम जर तुम्ही अवलंबला तर मन शांत होऊन झोप सुधारते आणि ऊर्जा वाढते.

4- शरीर मजबूत आणि चपळ बनते- चालण्याच्या या नियमामुळे शरीर अधिक चपळ होते आणि मजबूत देखील व्हायला मदत होते. या नियमामध्ये तुम्ही वेगवेगळ्या गतीने चालल्याने स्नायूंना देखील लवचिकता प्राप्त होते व सांधेदुखी किंवा थकवा कमी व्हायला मदत होते. सांध्यांच्या हालचाली सुधारण्यासाठी आणि पाठीच्या माकड हाडासाठी देखील हा चालण्याचा नियम फायद्याचा आहे.
6-6-6 चा चालण्याचा नियम म्हणजेच वॉकिंग रुल तुम्ही अवघ्या 18 मिनिटात फॉलो करू शकतात व तुमच्या जीवनामध्ये किंवा जीवनशैलीत मोठा बदल घडवून आणू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe