Newasa Assembly Election : महाराष्ट्रातील यंदाची विधानसभा निवडणुक विशेष चुरशीची झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, भाजप आणि काँग्रेस हे सहा प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात होते. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी, बच्चू कडू यांच्याप्रहारसह अनेक पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
यंदाच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी देखील झाली आहे. महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये देखील बंडखोरीचे प्रमाण विशेष उल्लेखनीय असून बंडखोरांनी अपक्ष उमेदवारीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे.
खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांच्या फुटी नंतर पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक विशेष लक्षवेधी ठरली असून या निवडणुकीत नेमके कोणाचे पारडे जड भरत आहे? याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
वीस तारखेला विधानसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून आता 23 तारखेला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान या विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधीच विविध संस्थांचे एक्झिट पोल समोर येत आहेत.
यामध्ये सकाळचा एक्झिट पोल देखील समोर आला आहे. सकाळच्या एक्झिट पोल मध्ये राज्यातील कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी ठरणार? याबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या एक्झिट पोल मध्ये नेवासा विधानसभा मतदारसंघाबाबतही अंदाज देण्यात आला आहे. सदर एक्झिट पोल नुसार नेवासा विधानसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे पारडे जड आहे.
नेवासा विधानसभा मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे शंकरराव गडाख आणि महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते.
शंकरराव गडाख हे नेवासाचे विद्यमान आमदार आहेत अन यावेळी देखील शंकरराव गडाख हेच येथून विजयी होणार असा अंदाज सकाळच्या एक्झिट पोल मध्ये वर्तवण्यात आला आहे.
तथापि हा फक्त एक्झिट पोलचा अंदाज आहे. प्रत्यक्षात जेव्हा मतमोजणी होईल तेव्हाच नेवासाचा पुढील आमदार कोण असेल हे क्लियर होणार आहे. उद्या अर्थातच 23 नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी हे सारे चित्र क्लिअर होणार आहे.