काही नका करू परंतु आयुष्यात टर्म इन्शुरन्स घ्या! आयुष्यातील ठरेल शहाणपणाचा निर्णय; कुटुंबाच्या आर्थिक संरक्षणासह मिळतील अनेक फायदे

विमा उतरवणे किंवा विमा घेणे आजकाल आर्थिक स्थिरता आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असून प्रत्येकाने विमा खरेदी करणे ही काळाची गरज आहे. विम्याचे अनेक प्रकार आहेत.परंतु त्यामध्ये टर्म इन्शुरन्स प्लॅन घेणे हे खूप महत्त्वाचे असून हा प्लान अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.

Ajay Patil
Updated:
term insurance plan

Benefit Of Term Insurance Plan:- विमा उतरवणे किंवा विमा घेणे आजकाल आर्थिक स्थिरता आणि संरक्षणाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची बाब असून प्रत्येकाने विमा खरेदी करणे ही काळाची गरज आहे. विम्याचे अनेक प्रकार आहेत.परंतु त्यामध्ये टर्म इन्शुरन्स प्लॅन घेणे हे खूप महत्त्वाचे असून हा प्लान अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे.

यामुळे तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबाची आर्थिक सुरक्षा निश्चित करू शकतात. टर्म इन्शुरन्स म्हणजेच मुदत विमा हा जीवन विम्याचा सर्वात सोपा प्रकार असून जो ठराविक वर्षासाठी आर्थिक संरक्षण प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो.

दुर्दैवाने जर पॉलिसीच्या मुदती दरम्यान पॉलिसीधारकाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला म्हणजेच नॉमिनीला अनेक आर्थिक लाभ दिले जातात. त्यामुळे टर्म इन्शुरन्स प्लॅन घेऊन ठेवणे खूप गरजेचे आहे.

काय आहेत टर्म इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे?

1- कुटुंब संरक्षणासाठी सर्वात चांगली पॉलिसी- टर्म इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचे सर्वात मोठा फायदा किंवा कारण म्हणजे तुम्ही तुमच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा या माध्यमातून करू शकतात. कुटुंब जर संपूर्णपणे तुमच्या कमाईवर अवलंबून आहे किंवा ते तुमच्या उत्पन्नावर अवलंबून असेल तर या दृष्टिकोनातून तुम्हाला तुमच्या जोडीदार किंवा पालक आणि मुलांचे आर्थिक दृष्टिकोनातून संरक्षण करणे खूप गरजेचे असते.

तुमच्यासोबत जर काही दुर्दैवी घटना घडल्यास मुदत विमा योजना तुमची आर्थिक सुरक्षितता निश्चित करते. तुमच्या पश्चात कुटुंबाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याला तुम्हाला मदत होते. टर्म इन्शुरन्स प्लान जर तुम्ही घेतलेला असेल तर तुम्हाला कुटुंबाची काळजी करण्याची गरज भासत नाही व तुम्हाला एक प्रकारे मानसिक शांती देखील मिळते.

2- मालमत्तेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा- आपल्याला माहित आहे की, आजकाल अनेक जणांनी होमलोन किंवा कारलोन घेतलेले असते व अशा लोनचे हप्ते सुरू असतात. परंतु दुर्दैवाने जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर टर्म इन्शुरन्स तुमच्या कुटुंबाला या कर्जाच्या ओझ्यातून वाचवायला मदत करतो.

टर्म इन्शुरन्स मुळे तुम्हाला कर्जाची थकबाकी भरण्याचा ताण येत नाही. तुम्ही मेहनतीने बांधलेले किंवा खरेदी केलेले घर किंवा कार तुमच्या पश्चात देखील कायम तुमच्या कुटुंबासोबत असते.

3- कुटुंबाला आवश्यक आर्थिक मदत होते- समजा पॉलिसीधारकाचा जर मृत्यू झाला तर पॉलिसीधारकाच्या पश्चात त्याच्या कुटुंबाच्या पैशाचे व्यवस्थापन करणे खूप आव्हानात्मक असते. अशा कठिण कालावधीमध्ये टर्म इन्शुरन्स तुम्हाला तुमच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत पुरवतो.

म्हणजे एकंदरीत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरदेखील टर्म इन्शुरन्स प्लानमुळे कुटुंबातील सदस्य त्यांचे जीवनमान टिकवून ठेवू शकतात. कुठल्याही प्रकारची आर्थिक समस्या न येता दैनंदिन खर्चाचे व्यवस्थापन करू शकतात.

4- कमी प्रीमियममध्ये मिळते आकर्षक विमा कव्हर- तुम्ही जितक्या लवकर टर्म इन्शुरन्स घ्याल तितका कमी प्रमाणात तुम्हाला भरावा लागतो. या उलट जर तुमचे वय जास्त असेल तर तुम्हाला टर्म प्लॅन खरेदी करण्यासाठी जास्त प्रीमियम भरणे गरजेचे असते. त्यामुळे लवकरात लवकर टर्म इन्शुरन्स घेऊन कमी प्रीमियम सह तुम्ही चांगले कव्हरेज घेऊन तुमच्या आयुष्य सुरक्षित करू शकतात.

टर्म इन्शुरन्समुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांना आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू शकतात. एकंदरीत पाहता जीवन हे अनिश्चिततेने भरलेले आहे. कधी काय होईल हे कोणीच काही सांगू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये मुदतीच्या जीवन विमा म्हणजेच टर्म इन्शुरन्स योजनेचे पहिले उद्दिष्ट हे आहे की,

तुमच्या कुटुंबाला अनिश्चित काळासाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व तुमच्यासोबत काही दुर्दैवी घटना घडली तर टर्म प्लॅन मधील विमा रक्कम तुमच्या प्रियजनांना आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यास मदत करते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक अनिश्चितते करिता तयार राहण्यासाठी तुम्ही एक कोटी रुपयांचा मुदत विमा योजना म्हणजेच टर्म प्लान निवडू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe