महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घटना पायदळी तुडवण्याचे काम केले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, परंतु महाराष्ट्राच्या राज्यपालांनी घटना पायदळी तुडवण्याचे काम केले. मंदिरे उघडण्याबाबत मुख्यमंत्र्यांना त्यांनी पाठवलेले पत्र म्हणजे अधिकाराचे उल्लंघन आहे.

त्यामुळे त्यांना राज्यपालपदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीका शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली. शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खोतकर नगर येथे आले असता

पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी नगरसेवक विक्रम राठोड, संजय शेंडगे, संभाजी कदम, नगरसेवक भाऊ बोरुडे, मदन आढाव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

खोतकर म्हणाले, मी ३५ वर्षांपासून विधिमंडळ कामकाजात आहे, परंतु माझ्या आठवणीत राज्यपालांनी अशाप्रकारे भूमिका घेतल्याचे आठवत नाही.

सध्याच्या राज्यपालांना भारतीय संविधान मान्य नाही का? राज्यपालपदाच्या खुर्चीवर बसून जातीवाद करणे चुकीचे आहे. त्यामुळे या पदावर राहणे त्यांना संयुक्तिक नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थपणे राज्याचा कारभार करत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी त्यांनी काळजी घेतली आहे.

मंदिरे उघडण्याबाबत जालना येथेच आम्ही सुरुवातीला मागणी केली होती, परंतु भाजप यात द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत, असा टोलाही अर्जुन खोतकर यांनी यावेळी लगावला

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe