कर्जत-जामखेडमधील निसटत्या विजयात महायुतीच्या ‘या’ नेत्याची रोहित पवारांना मदत ? नगरमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

2019 च्या निवडणुकीत देखील येथे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशीच लढत झाली होती. गेल्या लढतीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. दरम्यान गेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे हे संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले होते. रोहित पवार यांच्या खेम्यात असणारे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऐनवेळी रामाभाऊंच्या ताफ्यात आलेत अन विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांचे या निवडणुकीतील पारडे जड झाले.

Tejas B Shelar
Published:

Karjat Jamkhed News : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेतला आणि हाय प्रोफाईल मतदारसंघ. कारण म्हणजे या ठिकाणी शरद पवारांचे नातू दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे अन देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय नेते प्राध्यापक राम शिंदे उभे होते.

2019 च्या निवडणुकीत देखील येथे राम शिंदे विरुद्ध रोहित पवार अशीच लढत झाली होती. गेल्या लढतीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. दरम्यान गेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी राम शिंदे हे संपूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले होते.

रोहित पवार यांच्या खेम्यात असणारे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ऐनवेळी रामाभाऊंच्या ताफ्यात आलेत अन विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांचे या निवडणुकीतील पारडे जड झाले. मात्र असे असले तरी या लढतीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला.

नक्कीच कर्जत जामखेडची यंदाची लढत ही फारच चुरशीची झाली. मतमोजणी सुरू झाल्यानंतर या मतदारसंघात कधी रोहित पवार आघाडीवर गेले तर कधी राम शिंदे आघाडीवर गेलेत. मात्र शेवटच्या फेरी अखेर रोहित पवारांनी राम शिंदे यांचा काही हजार मतांनी पराभव केला.

पराभवाचे मार्जिन हे फारच कमी राहिले मात्र विजय हा विजयच असतो असे म्हणत रोहित पवारांनी आपल्या विजयावर आनंद व्यक्त केला. मात्र शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या विजयानंतर आता एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

रोहित पवारांच्या विजयात महायुतीच्या काही अदृश्य हातांनी त्यांना मदत केली असल्याच्या चर्चा सध्या मतदारसंघासहित संपूर्ण नगर जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. रोहित पवार यांच्या विजयामागे त्यांचे काका अजित पवार यांची मदत महत्त्वाची असल्याची चर्चा सुरू आहे.

निकालानंतर कर्जत जामखेड मध्ये अजित पवारांनी रोहित पवार यांना मदत केली अशा चर्चा सुरू झाल्यात आणि त्यानंतर आता सोशल मीडियामध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये प्रीती संगमावर अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आले होते.

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, आमदार रोहित पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या ठिकाणी आले होते. यावेळी अजित पवार आणि रोहित पवार हे आमने सामने आलेत तेव्हा या दोन्ही नेत्यांमध्ये मिश्किल संभाषण केले. यावेळी अजित पवारांनी रोहित पवार यांना पाहून बच गया, दर्शन घे… दर्शन, काकाचं.

वाचलास, नाहीतर माझी सभा झाली असती तर काय झालं असतं? अशी टिप्पणी केली. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी एकही सभा घेतली नाही. दरम्यान हेच अजित पवार यांनी रोहित पवारांना सांगितले. अन यामुळे आता राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा न घेऊन अजित पवारांनी अप्रत्यक्षरीत्या रोहित पवारांना मदतच केली अशा चर्चांनी जोर पकडला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe