नगर शहरात हीट अँड रन प्रकरण ..! वाहनचालकाने दुचाकीस्वारासह चौघांना उडवले,एकाचा मृत्यू

Ahmednagarlive24
Published:

अहिल्यानगर : आतापर्यंत पुणे तसेच मुंबई सारख्या मोठ्या शहरात हिट अँड रनचे प्रकार घडत होते; मात्र आता आपल्या अहिल्यानगर शहरात देखील असा प्रकार आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे, तर चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात घडली आहे. या घटनेतील जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी,अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड जवळ असलेल्या महात्मा फुले चौकाजवळ एका पांढऱ्या रंगाच्या XUV 500 या आलिशान वाहनाने रस्त्याने चालणाऱ्या चार चाकी आणि दुचाकी तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना धडक जोरदार दिली.

यामध्ये एकाचा घटना स्थळीच मृत्यू झाला. तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेनंतर या भागात मोठ्या प्रमाणात नागरीकांनी गर्दी केली होती. दरम्यान याबाबत माहिती मिळताच आ संग्राम जगताप यांचे बंधू सचिन जगताप यांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली जखमींची विचारपूस करत त्यांना धीर दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe