एलआयसीची ‘ही’ पॉलिसी आयुष्यभर देईल तुम्हाला 1 लाख रुपये पेन्शन आणि करेल सगळे स्वप्न पूर्ण! जाणून घ्या माहिती

एलआयसीची जीवन शांती योजना ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व खास असून यामध्ये तुम्ही एकदाच पैसे गुंतवले तरी काही काळानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळत राहतो व निश्चित रक्कम मिळत राहते. या योजनेतून एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर देखील नियमितपणे पैसे मिळत राहतात.

Ajay Patil
Published:
lic plan

LIC Pension Plan:- व्यक्ती संपूर्ण आयुष्यामध्ये एखादा व्यवसाय करत असतो किंवा नोकरी करत असतो आणि या माध्यमातून कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असतो. परंतु जेव्हा दिवसां मागून दिवस निघतात आणि वयाची 50 किंवा 60 नंतर मात्र निवृत्तीचे वेध लागते व आता मुलांच्या हाती सगळे सोपवून आपण निवांतपणे राहिलेले आयुष्याचे दिवस आनंदात व्यतीत करावे ही प्रत्येकाची इच्छा असते.

परंतु हे स्वप्न किंवा इच्छा पूर्ण करायचे असेल तर याकरिता तुम्हाला आत्तापासूनच निवृत्तीनंतर आर्थिक दृष्टिकोनातून नियोजन करून ठेवणे खूप गरजेचे असते. आतापासून तुम्ही याबाबतीत पावले उचलाल तरच तुम्हाला वयाच्या साठ वर्षानंतर तुमच्या खर्चासाठी पैसा उपलब्ध होऊ शकतो व तुम्ही आरामात जीवन जगू शकतात.

अगदी याच पद्धतीने तुमचा देखील प्लॅनिंग असेल तर तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करू शकतात. तसे पाहायला गेले तर एलआयसीकडे अनेक पेन्शन पॉलिसी आहेत.

परंतु यामध्ये एलआयसीची जीवन शांती योजना ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व खास असून यामध्ये तुम्ही एकदाच पैसे गुंतवले तरी काही काळानंतर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळत राहतो व निश्चित रक्कम मिळत राहते. या योजनेतून एकरकमी गुंतवणूक केली तर तुम्हाला निवृत्तीनंतर देखील नियमितपणे पैसे मिळत राहतात.

एलआयसीच्या न्यू जीवन शांती योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत?
कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो मग तो नोकरदार असो वा व्यापारी. मात्र यामध्ये वयाची अट असून यामध्ये किमान वय 30 वर्षे आणि कमाल 79 वर्ष असणे गरजेचे आहे. या योजनेमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही जितक्या लवकरात लवकर म्हणजेच कमी वयात गुंतवणूक केली तर तुम्हाला याचा जास्त चांगला फायदा मिळतो.

ही एक सिंगल प्रीमियम पॉलिसी म्हणजेच एकल प्रीमियम पॉलिसी असून तुम्हाला एकदाच गुंतवणूक करावी लागते व एकदा केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला आयुष्यभर पेन्शनचा लाभ मिळत राहतो.

या योजनेअंतर्गत कमीत कमी दीड लाख रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे असते.यामध्ये जास्तीत जास्त कितीही रक्कम तुम्ही गुंतवू शकतात. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही यामध्ये जितकी जास्त रक्कम गुंतवाल तितकी जास्त रक्कम तुम्हाला पेन्शन म्हणून मिळते.

गुंतवणूक केल्यानंतर किती कालावधीत पेन्शन सुरू होते?
एलआयसीच्या नवीन जीवन शांती प्लानमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षांनी पेन्शन सुरू होते व तुमचे वय 40 वर्षे असेल तर वयाच्या 45 व्या वर्षापासून तुम्हाला पेन्शन सुरू होईल. जर वय 55 असेल तर 60 व 60 असेल तर 65 वर्षानंतर तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळणे सुरू होते.

अशाप्रकारे तुम्हाला एक लाख रुपये पेन्शन मिळू शकते
समजा तुमचे वय आता 45 वर्षे आहे व या पॉलिसीमध्ये तुम्हाला एकदाच प्रीमियम भरून एक लाख रुपये पेन्शन मिळवायचे आहे तर तुम्हाला एकरकमी एकदाच प्रीमियम म्हणून 11 लाख रुपये गुंतवावे लागतील.

पाच वर्षानंतर म्हणजे जेव्हा तुम्ही पन्नास वर्षे पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला पेन्शनचा लाभ सुरू होईल व तुम्हाला वार्षिक सुमारे एक लाख म्हणजेच 99,440 रुपये इतकी पेन्शन मिळत राहील.

समजा तुम्ही जर वयाच्या 55 व्या वर्षी हा प्लॅन विकत घेतला व तुम्ही सिंगल प्रीमियम अंतर्गत 11 लाख रुपये गुंतवले तर पाच वर्षानंतर म्हणजेच तुम्ही जेव्हा वयाच्या साठ वर्षाचे व्हाल तेव्हा तुम्हाला पेन्शन सुरू होते व तुम्हाला आयुष्यभर वार्षिक एक लाख 2 हजार 850 रुपये पेन्शन मिळत राहते. विशेष म्हणजे तुम्ही या प्लानमध्ये दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी पेन्शन घेऊ शकतात.

अजून मिळतात हे फायदे

1- पेन्शन व्यतिरिक्त या योजनेमध्ये पॉलिसी धाराकाचा म्हणजेच पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर नॉमिनीला संपूर्ण रक्कम व्याजासह परत मिळते.

2- हे पॉलिसी कधीही सरेंडर केली जाऊ शकते व यामध्ये सरेंडर व्हॅल्यू इतर पॉलिसीच्या तुलनेत जास्त आहे.

3- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या प्लॅन अंतर्गत कर्जाची सुविधा देखील मिळते व तुम्ही पॉलिसी घेतल्यानंतर तीन महिने पूर्ण केल्यावर कर्ज देखील घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe