अपयशातून सावरायला मला थोडा वेळ लागेल, तरी लवकरच तालुक्यातील प्रत्येक गावात पुन्हा जाणार- माजी आमदार शंकरराव गडाख यांचा निर्धार

चूरशीच्या लढतीमध्ये माजी आमदार शंकराव गडाख यांचा निसटता पराभव झाला व या ठिकाणहून विठ्ठलराव लंघे हे विजयी झाले. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मात्र आता माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी काही ठिकाणी आभार सभेचे आयोजन केले होते

Ajay Patil
Published:
shankarrao gadakh

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाचे असलेल्या निवासा विधानसभा मतदारसंघांमधून महायुती अर्थात शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून विठ्ठलराव लंघे यांना उमेदवारी देण्यात आली होती.तर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी मंत्री शंकरराव गडाख हे निवडणुकीच्या रिंगणात होते.

झालेल्या या चूरशीच्या लढतीमध्ये माजी आमदार शंकराव गडाख यांचा निसटता पराभव झाला व या ठिकाणहून विठ्ठलराव लंघे हे विजयी झाले. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मात्र आता माजी आमदार शंकरराव गडाख यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी काही ठिकाणी आभार सभेचे आयोजन केले होते व त्यातीलच आभार सभा त्यांनी सोनई येथे मुळा कारखाना प्रांगणामध्ये आयोजित केली होती व त्यानिमित्ताने त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केले.

अपयशातून सावरून लवकरच तालुक्यातील प्रत्येक गावात जाणार- शंकरराव गडाख
झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेवासा विधानसभा मतदारसंघातून शंकरराव गडाख यांचा निसटता पराभव झाला व या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता मतदारांचे आभार मानण्याकरिता सोनई येथे मुळा कारखाना प्रांगणात आभार सभेचे आयोजन केले होते व यावेळी त्यांनी बोलताना म्हटले की, नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावात दोन ते तीन वेळी भेटी दिल्या. निवडणूक म्हटली म्हणजे हार-जित ही चालूच असते.

यश-अपयशातून पुढे जावे लागते व यातूनच सावरायला मला साहजिकच थोडा वेळ लागणार असला तरी लवकरच नेवासा तालुक्यातील प्रत्येक गावात पुन्हा जाणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी या निमित्ताने केले. यावेळी पुढे बोलताना त्यांनी म्हटले की तिरंगी लढत असल्यामुळे आपला विजय होईल असा कार्यकर्त्यांना देखील मोठा विश्वास होता.

तरीदेखील सर्वांना निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने घेण्याच्या सूचना केल्या होत्या. काही छोट्या-मोठ्या गोष्टी सोडल्या तर आपण कुठेही कमी पडलो नाहीत. तसेच यश मिळो व अपयश याची काळजी करणारा मी नसून मी लढणारा व्यक्ती आहे व यापुढे देखील असेच लढत राहणार असे देखील गडाख यांनी यावेळी म्हटले.

आपल्या पराभवामुळे अनेकांना विकृत आनंद मिळाल्याचे सांगत त्यांनी पुढे म्हटले की,यापुढे तालुक्याचे काय? विकासाकरिता जी धमक लागते ती समोरच्यामध्ये आहे का? इत्यादी प्रश्न देखील त्यांनी या निमित्ताने उपस्थित केले. मला सत्ता व पैसा मिळत होता.परंतु तालुक्याच्या निष्ठेसाठी नम्रपणे मी नाकारले.

सोयीचे राजकारण जर केले असते तर मला अपयश कधीच मिळाले नसते असे देखील त्यांनी म्हटले. आयुष्यामध्ये खूप संघर्ष केले परंतु हा संघर्ष खूप मोठा असून यापुढे देखील असा संघर्ष करावा लागेल. तुम्ही जर साथ दिली तर यापुढील काळात मी नक्कीच यश मिळून दाखवेल असा विश्वास देखील त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe