अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाला मिळाली सर्वात जास्त व सर्वात कमी मते? कुणाला मिळाला किती लीड? वाचा एका क्लिकवर

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितले तर कुणाला किती मते मिळाली किंवा कोण किती फरकाने निवडून आला? याबाबत देखील आपल्याला बऱ्याच प्रमाणात चर्चा पाहायला मिळतात. या निवडणुकीच्या निकालाच्या दृष्टिकोनातून बघितले तर बरेच उमेदवारांचा निसटता पराभव झाला व काठावर देखील अनेक पास झाल्याचे उदाहरणे आपण बघितले असतील.

Ajay Patil
Published:
politician

Ahilyanagar News:- राज्यातील विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या व त्यांचा निकाल देखील जाहीर झाला. आपल्याला माहित आहे की ,यामध्ये महायुतीला प्रचंड प्रमाणात कधी नव्हे एवढे बहुमत मिळाले व आता राज्याच्या सत्ता स्थानी महायुतीचे सरकार येणार हे निश्चित आहे.

परंतु या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर बघितले तर कुणाला किती मते मिळाली किंवा कोण किती फरकाने निवडून आला? याबाबत देखील आपल्याला बऱ्याच प्रमाणात चर्चा पाहायला मिळतात. या निवडणुकीच्या निकालाच्या दृष्टिकोनातून बघितले तर बरेच उमेदवारांचा निसटता पराभव झाला व काठावर देखील अनेक पास झाल्याचे उदाहरणे आपण बघितले असतील.

या दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदार संघाच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांना सर्वाधिक मते मिळाली तर शेवटपर्यंत चुरशीची लढत पाहिला मिळालेल्या कर्जत जामखेडमधून आमदार रोहित पवार यांना सर्वात कमी मतांनी विजय मिळवता आला.

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणाला मिळाले किती मते?
अहिल्यानगर जिल्ह्यातील जर बाराही विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर…

1-अहिल्यानगर शहर मतदार संघ-अजित पवार गटाचे विजयी उमेदवार संग्राम जगताप यांना एकूण एक लाख 18 हजार 636 तर अभिषेक कळमकर यांना 79 हजार अठरा मते मिळाली.

2- अकोले विधानसभा मतदारसंघ- अकोले विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे किरण लहामटे यांना एकूण 73 हजार 958 तर शरद पवार गटाचे अमित भांगरे यांना 68,402 इतके मते मिळाली.

3- कर्जत जामखेड मतदारसंघ- या ठिकाणी शरद पवार गटाचे रोहित पवार यांना एक लाख 27 हजार 676 तर राम शिंदे यांना एक लाख 26 हजार 433 इतके मते मिळाली.

4- शिर्डी मतदारसंघ- शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांना एक लाख 44 हजार 778 तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांना 74 हजार 496 इतकी मते मिळाली.

5- राहुरी विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी भाजपचे शिवाजी कर्डिले यांना एक लाख 35 हजार 859 तर शरद पवार गटाचे प्राजक्त तनपुरे यांना एक लाख एक हजार 372 मते मिळाली.

6- संगमनेर विधानसभा मतदारसंघ– या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे अमोल खताळ यांना एक लाख 12 हजार 386 तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना 1,1826 मते मिळाली.

7- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी भाजपचे विक्रम पाचपुते यांना 99820, तर अपक्ष असलेले राहुल जगताप यांना 62 हजार 664 इतकी मते मिळाली.

8- श्रीरामपूर मतदारसंघ- या ठिकाणी काँग्रेसचे हेमंत ओगले यांना 66 हजार 99, तर शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांना 52 हजार 726 मते मिळाली.

9- पारनेर मतदारसंघ- या ठिकाणी अजित पवार गटाचे काशिनाथ दाते यांना एक लाख 13 हजार 630 तर राणी लंके यांना एक लाख 12 हजार 104 मते मिळाली.

10- कोपरगाव विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणहून अजित पवार गटाचे आशुतोष काळे यांना एक लाख 61 हजार 147 मते मिळाली तर शरद पवार गटाचे संदीप वर्पे यांना 36 हजार पाचशे तेवीस इतके मते मिळाली.

11- शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी भाजपच्या मोनिका राजळे यांना 99775 तर शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे यांना 80 हजार 732 मते मिळाली.

12- नेवासा विधानसभा मतदारसंघ- या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठलराव लंघे यांना 95 हजार 444 मते मिळाली तर उद्धव सेनेचे शंकरराव गडाख यांना 91 हजार 423 मते मिळाली.

कुणाला मिळाली किती लीड?
आशुतोष काळे यांना सर्वाधिक लीड मिळाले असून एकूण एक लाख 24 हजार 624 इतके आहे. त्यासोबत राधाकृष्ण विखे पाटील 70 हजार 282,संग्राम जगताप 39 हजार 618, विक्रम पाचपुते 37 हजार 156,शिवाजी कर्डिले 34,487,

मोनिका राजळे 19 हजार 43, हेमंत ओगले 13373, अमोल खताळ 10 हजार 560, किरण लहामटे 5556 , विठ्ठल लंघे चार हजार एकवीस, काशिनाथ दाते 1526 तर सर्वात कमी रोहित पवार यांना 1243 इतके लीड मिळाले.

या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की अहिल्यानगर जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य हे आशुतोष काळे यांना मिळाले असून सर्वात कमी हे रोहित पवार यांना मिळाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe