बाजारामध्ये रॉयल एनफिल्डची अजून एक बाईक करणार मोठी धूम! मिळणार 443 सीसीचे इंजिन; जाणून घ्या किती राहू शकते किंमत?

आपल्याला रॉयल एनफिल्ड हे नाव आवर्जून घ्यावे लागते. कारण रॉयल एनफिल्डच्या सगळ्याच बाईकचा एक भारतामध्ये मोठा चाहता वर्ग असून तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या बाईक्सना मोठी क्रेझ असल्याचे आपल्याला दिसून येते. या बाईकचे फीचर्स तसेच लूक, तसेच असणारा एक भारदस्तपणा इत्यादीमुळे या कंपनीच्या बाईक खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात.

Ajay Patil
Published:
royal enfield scram 440 bike

Royal Enfield Scram 440 Bike:- भारतीय बाईक बाजारपेठ जर आपण बघितली तर या ठिकाणी अनेक वर्षांपासून आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांच्या बाईकचे वर्चस्व दिसून येते. यात प्रामुख्याने हिरो तसेच होंडा, बजाज, टीव्हीएस सारख्या कंपन्यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

या कंपन्यांच्या माध्यमातून आजपर्यंत भारतीय बाजारपेठेमध्ये परवडणाऱ्या किमतींपासून तर लाखो रुपये किमतींपर्यंतच्या बाईक सादर करण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे या कंपन्यांच्या बाईक ग्राहकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असून त्यांना मागणी देखील मोठ्या प्रमाणावर असते.

परंतु या सगळ्या कंपन्यांच्या मध्ये आपल्याला रॉयल एनफिल्ड हे नाव आवर्जून घ्यावे लागते. कारण रॉयल एनफिल्डच्या सगळ्याच बाईकचा एक भारतामध्ये मोठा चाहता वर्ग असून तरुणांमध्ये रॉयल एनफिल्डच्या बाईक्सना मोठी क्रेझ असल्याचे आपल्याला दिसून येते. या बाईकचे फीचर्स तसेच लूक, तसेच असणारा एक भारदस्तपणा इत्यादीमुळे या कंपनीच्या बाईक खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जातात.

आपल्याला माहित आहे की आतापर्यंत या कंपनीने अनेक मॉडेलचे अपडेटेड व्हर्जन बाजारामध्ये आणले आहेत. अगदी याच पद्धतीने जर बघितले तर रॉयल एनफिल्डने मोटोव्हर्सा 2024 मध्ये नवीन रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 440 चे अनावरण केले आहे व कंपनी सध्या भारतात Scram 411 सध्या विकत आहे.

यामध्ये मिळालेली माहिती अशी आहे की ही मोटरसायकल आता सध्याचे जे काही मॉडेल आहे त्यापेक्षा अधिक पावरफुल असून लूक देखील खूप जबरदस्त ठेवण्यात आलेला आहे.

तसेच नवीन टेक्नॉलॉजी सोबत ही लाँच केली जाणार असे देखील बोलले जात आहे. मात्र या बाईकची किंमत किती राहील हे मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नसून जानेवारी 2025 पर्यंत या बाईकची किंमत जाहीर करण्यात येईल अशी एक शक्यता आहे व त्यानंतर या बाईकचे डिलिव्हरी सुरू होईल.

काय आहेत रॉयल एनफिल्ड Scram 440 चे वैशिष्ट्ये?
रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 440 चा लूक हा काही प्रमाणामध्ये स्क्रॅम 411 सारखा असेल अशी शक्यता आहे. परंतु यामध्ये बरेच लक्षणीय असे बदल करण्यात आलेले आहेत. स्क्रॅम 411 च्या तुलनेमध्ये या नवीन बाईकचे वजन जास्त राहील अशी एक शक्यता आहे. यासोबतच सेमी डिजिटल अनलॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,

एलईडी हेडलाईट आणि टेल लाईट, बल्ब इंडिकेटर देण्यात आले असून हे सर्व फिचर आधीच्या बाईक मधील आहेत. तसेच कंपनीने आता यूएसबी टाइप ए चार्जर या बाईक सोबत दिला आहे. तसेच या बाईकमध्ये ट्रिपड पॉड नेवीगेशन आणि इतर फीचर्स दिले आहेत. ही बाईक कंपनी दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करणार आहे.

कसे असेल या बाईकचे इंजिन?
कंपनीने या बाईकमध्ये 443cc सिंगल सिलेंडर इंजन दिले असून ते आधी पावरफुल असेल व हे सिलेंडर तीन मीमी मोठे आणि 81 मिमी रुंद आहे. हे इंजिन सध्या असलेल्या बाईक मधील इंजिनपेक्षा 4.5% जास्त पावर आणि 8.5% जास्त टॉर्क जनरेट करेल असा कंपनीने दावा केला आहे.

किती असू शकते किंमत?
रॉयल एनफिल्ड स्क्रॅम 440 ची किंमत कंपनीने अधिकृतपणे अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु साधारणपणे या बाईकची एक्स शोरूम किंमत सुमारे दोन लाख तीस हजार रुपये असेल अशी एक शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe