कार खरेदी करायचे आहे आणि बजेट 5 लाख आहे! तर ‘ही’ फॅमिली कार ठरेल तुमच्यासाठी फायद्याची; आतापर्यंत लाखो लोकांनी केली आहे खरेदी

कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या परवडणाऱ्या किमतीतल्या कार सध्या उपलब्ध असल्याने कार निवडीमध्ये बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्याप्रमाणे कार खरेदी करताना बजेट पाहिला जातो. अगदी त्याप्रमाणे त्या कारपासून मिळणारे मायलेज तसेच इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये व त्यातल्या त्यात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असलेल्या वैशिष्ट्यांचा प्रामुख्याने विचार केला जातो.

Ajay Patil
Published:
tata tiago

Features Of Tata Tiago Car:- भारतातील कार बाजारपेठेत आपल्याला अनेक कंपन्यांच्या वेगवेगळे मॉडेल्स आणि सेगमेंटमधील कार आपल्याला विक्री करता उपलब्ध असल्याचे दिसून येतात. जेव्हाही कुठलीही व्यक्ती कार खरेदी करण्याचा विचार करते तेव्हा सगळ्यात अगोदर आपला आर्थिक बजेट पाहते व त्या बजेटमध्ये चांगलीत चांगली वैशिष्ट्य असणारी कार मिळेल या दृष्टिकोनातून विचार करत असतो व त्या पद्धतीनेच कारचा शोध घेत असतो.

परंतु कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या परवडणाऱ्या किमतीतल्या कार सध्या उपलब्ध असल्याने कार निवडीमध्ये बऱ्याचदा गोंधळ उडतो. त्याप्रमाणे कार खरेदी करताना बजेट पाहिला जातो. अगदी त्याप्रमाणे त्या कारपासून मिळणारे मायलेज तसेच इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये व त्यातल्या त्यात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून असलेल्या वैशिष्ट्यांचा प्रामुख्याने विचार केला जातो.

या सगळ्या गोष्टींवर जी कार खरी उतरते ती कार घेण्याला ग्राहक पसंती देत असतात. या सगळ्या अनुषंगाने जर तुम्हाला देखील कार घ्यायची असेल तर आपण या लेखामध्ये अशाच एका कारबद्दल माहिती घेणार आहोत जी सहा लाखापेक्षा अधिक लोकांनी खरेदी केलेली आहे व या निमित्ताने या कारने विक्रीमध्ये एक नवा रेकॉर्ड देखील केला आहे. त्यामुळे या लेखात आपण टाटा कंपनीच्या टियागो बद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत.

टाटा टियागोत मिळतील कमी किमतीत उत्कृष्ट फीचर्स
टाटा टियागो या कारबद्दल जर बघितले तर टाटा कंपनीने या कारला एप्रिल 2016 मध्ये पहिल्यांदा लॉन्च केली होती. ही कार तिच्या सेगमेंट मधील सर्वात सुरक्षित कारपैकी एक मानली जाते. कारण कारच्या सुरक्षिततेबद्दल जे काही ग्लोबल NCAP क्रॅश टेस्ट घेतली जाते त्या टेस्टमध्ये टाटा टियागो या कारला तब्बल चार स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाली होती.

त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर टाटा टियागो हा ऑप्शन कार खरेदीसाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. जर आपण मिळालेली माहिती बघितली तर ऑक्टोबर पर्यंत टाटा टियागो या कारचे तब्बल पाच लाख 96 हजार 661 युनिटची विक्री झालेली होती.

या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते की ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे. या आकडेवारीनुसार जर प्रति महिना विक्रीची सरासरी काढली तर ती तब्बल 4500 युनिट इतकी होते. म्हणजे आतापर्यंत जवळपास सहा लाख युनिटच्या आसपास या कारची विक्री झालेली आहे.

टाटा टियागो ही सीएनजी आणि पेट्रोल अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये येते
टाटा टियागो मिडसाईट हॅचबॅक सेगमेंट मधील कार असून मारुतीची स्विफ्ट आणि वॅगनर यानंतर सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. कंपनीने एकूण सहा वेरियंटमध्ये ही कार सादर केली असून या कारचे इंजिन जर बघितली तर यामध्ये 1.2- लिटर पेट्रोल इंजिन दिले असून जे 86 पीएसची पावर आणि 113 एनएमचा टॉर्क जनरेट करते.

तसेच कंपनीने या इंजिनला पाच स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी कनेक्ट केले असून या कारमध्ये फिटेड सीएनजी देखील देण्यात आले आहे.

टाटा टियागोचे किती आहे मायलेज?
टाटा टियागो या कारच्या पेट्रोल व्हेरिएंटचे जर मायलेज बघितले तर ते प्रतिलिटर 16 किलोमीटर इतके आहे. तसेच सीएनजी व्हेरियंट देखील मायलेजच्या बाबतीत उत्तम असून सीएनजी व्हेरिएंट हे प्रतिकिलो 26 km चे मायलेज देते. त्यामुळे उत्कृष्ट मायलेज असल्याने देखील ग्राहकांसाठी ही कार परवडणारी ठरू शकते.

किती आहेत टाटा टियागो कारची किंमत?
या प्रकारे उत्कृष्ट फीचर्स आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या या कारची किंमत पाहिली तर ती 4 लाख 99 हजार इतकी आहे. त्यामुळे बजेटमध्ये जे कोणी कार खरेदी करण्याची प्लॅनिंग करत असतील त्यांच्यासाठी टाटा टियागो उत्तम कार ठरू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe