अहिल्यानगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव तसेच ढोरजळगाव, भातकुडगाव, अमरापूर, आव्हाने, बऱ्हाणपूर, आपेगाव तसेच आखतवाडे मळेगाव, सामनगाव तसेच साकेगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे लागवड होते. परंतु जर आपण यावर्षी कापसाची स्थिती बघितली तर अत्यंत कमी दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

Ajay Patil
Published:

Ahilyanagar News:- केंद्र सरकारच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. या खरेदी केंद्रांवर शासनाने कापसासाठी जो काही हमीभाव जाहीर केला आहे त्यानुसार खरेदी करण्यात येत असल्यामुळे नक्कीच यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास मदत होत आहे.

अगदी याच दृष्टिकोनातून जर आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव तसेच ढोरजळगाव, भातकुडगाव, अमरापूर, आव्हाने, बऱ्हाणपूर, आपेगाव तसेच आखतवाडे मळेगाव, सामनगाव तसेच साकेगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचे लागवड होते.

परंतु जर आपण यावर्षी कापसाची स्थिती बघितली तर अत्यंत कमी दर मिळत असल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी शासकीय हमीभावापेक्षा देखील कमी दराने खाजगी व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

परंतु आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात शेवगाव येथे शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून आता आनंद व्यक्त केला जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेवगाव तालुक्यात शेवगाव येथे शासकीय सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती व त्यामुळे आता मंगळवारपासून शेवगाव येथील रिद्धी सिद्धी व दुर्गा जिनिंग येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

शेवगाव तालुक्यातील अनेक गावांच्या परिसरात कपाशीची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर होते व यावर्षी कपाशीचे पीक चांगले आले असताना खाजगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मात्र शासकीय हमीभावापेक्षा देखील कमी दराने कापूस खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागत होता.

परंतु आता शासकीय हमीभाव केंद्र सुरू केल्यामुळे खाजगी कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून देखील कापसाच्या दरात निश्चित वाढ केली जाईल अशी एक शक्यता आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे शासनाने ज्याप्रमाणे शेवगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरू केले अगदी त्याचप्रमाणे पाथर्डी जवळ असणाऱ्या अमरापूर येथे देखील सीसीआय अंतर्गत कापसाचे खरेदी केंद्र सुरू केले तर तालुक्यातील जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

तसेच शेवगाव येथे होणारी ट्रॅफिक कोंडी व वाहतुक खर्चात देखील यामुळे निश्चित बचत होणार आहे. त्यामुळे शेवगाव प्रमाणेच अमरापुर येथे देखील शासकीय कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe