Low Investment Business Idea:- कमीत कमी गुंतवणुकीत जास्त नफा ज्या व्यवसायांच्या माध्यमातून मिळतो ते व्यवसाय करणे खूप फायद्याचे ठरते. तसे पाहायला गेले तर कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे भरपूर असे व्यवसाय आहेत. परंतु त्या व्यवसायांना असणारी मागणी किंवा ते बाराही महिने चालू शकतात का? हे देखील पाहणे खूप गरजेचे असते.
व्यवसायाची निवड करताना बऱ्याच जणांचा यामुळे मोठा गोंधळ उडताना आपल्याला दिसतो. व्यवसाय तर सुरू करायचा असतो आणि त्यासाठी पैसा देखील कमीत कमी गुंतवावा अशी आपली इच्छा असते. त्याप्रमाणेच व्यवसायाची निवड करण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो.
अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा असेल व कमीत कमी गुंतवणूक करून चांगला पैसा मिळवायचा असेल तर आपण या लेखात काही व्यवसायांची माहिती घेऊ. जी तुम्हाला नक्कीच फायद्याची ठरेल.
हे आहेत बारमाही चालणारे व कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारे व्यवसाय
1- डेअरी पार्लर व्यवसाय- हा व्यवसाय अतिशय उत्तम असा व्यवसाय असून याला बारमाही मागणी आहे आहे. बाराही महिने उत्तम पद्धतीने हा व्यवसाय चालू शकतो. डेअरी पार्लरच्या माध्यमातून दूध,दही, तूप तसेच पनीर व चीज अशा दुधापासून बनवलेल्या पदार्थांची विक्री केली जाते व अशा पदार्थांना दररोज मागणी असते हे आपल्याला माहिती आहे.
त्यामुळे स्वतःचे डेअरी पार्लर सुरू करायचे असेल तर योग्य जागा तसेच आवश्यक असणारे परवाने घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात. व्यवसायासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीचा विचार केला तर यामध्ये तुम्ही जागेची निवड कुठे केली आहे?
जागा स्वतःची आहे की भाड्याची? यानुसार फरक पडू शकतो. याशिवाय दुकानातील फर्निचर तसेच लागणारी साधनसामग्री, फ्रिज किंवा मनुष्यबळ इत्यादी सगळ्या गोष्टींवर गुंतवणूक अवलंबून असते. हा व्यवसायातून तुम्ही 30 ते 40% नफा मिळवू शकतात.
2- चहा आणि कॉफी शॉप- भारतातील सगळ्यात जास्त प्रमाणात लोकांचे आवडते पेय कोणते असेल तर ते चहा आहे. बरेच जण फ्रेश होण्यासाठी किंवा कामाचा ताण कमी करण्याकरिता दिवसभरात मोठ्या प्रमाणावर चहा आणि कॉफीचे सेवन करतात. नेमकी हीच संधी ओळखून तुम्ही चहा आणि कॉफीचा व्यवसाय सुरू करू शकतात.
विशेष म्हणजे हा दिवसभर आणि बारमाही चालणारा व्यवसाय असून अतिशय कमी बजेटमध्ये सुरू करता येतो. या व्यवसायाची सुरुवात तुम्ही घरातून देखील करू शकतात व हळूहळू त्यामध्ये वाढ करत चांगल्या पद्धतीने पैसा मिळवू शकतात.
तुमच्या परिसरातील असलेल्या ऑफिसेस तसेच दुकाने इत्यादी ग्राहक मिळवून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात व यासोबत स्नॅक्स देखील तुम्ही विक्री करू शकतात.
3- टिफिन सर्विस- आपल्याला माहित आहे की नोकरीसाठी किंवा शिक्षणाकरिता बहुतेक लोक घर सोडून शहरांमध्ये राहिला येतात व कुटुंब सोडून एकटे राहतात. असे लोक घरगुती जेवण मिळावे याकरिता मेस लावतात.
त्यामुळे ही संधी हेरून तुम्ही घरगुती अन्न पुरवण्यासाठी टिफिन सेवा व्यवसाय सुरू करू शकतात. हा कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा व बारमाही चालणारा व्यवसाय आहे. परंतु हा टिफिन सर्विस व्यवसाय जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर सुरू करायचा असेल तर त्याकरिता एफएसएसएआयचा परवाना घ्यावा लागतो.
4- कोल्ड्रिंक्स म्हणजे शीतपेय व्यवसाय- आजच्या घडीला शीतपेय विक्री हा देखील बारमाही चालणारा व्यवसाय ठरत आहे. विविध समारंभांमध्ये शीतपेयांची मागणी सध्या मोठी असल्याने हा व्यवसाय देखील बारमाही आपल्याला चालवता येऊ शकतो. सध्या ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला कोल्ड्रिंक्स म्हणजे शीतपेय आवडतात.
या व्यवसायामध्ये तुम्ही घाऊक विक्रेत्याकडून शीतपेय खरेदी करून सुरुवात करू शकतात. हा व्यवसाय सुरू करताना सुरुवातीला फ्रिजचा वापर करावा आणि चालेल तेवढ्या प्रमाणात कोल्ड्रिंक्स घ्यावेत आणि त्यानंतर तुमचा व्यवसाय चांगला चालू लागला की व्यवसायात वाढ करत जावेत व हा व्यवसाय देखील तुम्ही कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता.
5- फ्रुट शेक व्यवसाय- कोल्ड्रिंक्स बऱ्याच लोकांना आवडत नाही व असे लोक नेहमी फ्रुट शेक सेवनाकडे वळतात. ज्याप्रमाणे कोल्ड्रिंकची मागणी बाजारामध्ये जास्त प्रमाणात आहे. अगदी त्याचप्रमाणे फ्रुट शेकची देखील मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आंबा, केळी तसेच चिकू, संत्री,
मोसंबी आणि सीताफळ इत्यादी फळांचा शेक तयार करून तुम्ही सुरुवात करू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील कमीत कमी गुंतवणूक लागते. सुरुवातीला फळे, मिक्सर ग्राइंडर, दूध तसेच ग्लास आणि इतर काही सामग्री तुम्हाला लागते व मोक्याची जागा बघून तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करू शकतात.