विक्रम पाचपुते यांच्या विजयात समर्थकांची गनिमी कावा पद्धतीची प्रचार यंत्रणा ठरली फायद्याची! सगळ्या ठिकाणी विक्रम पाचपुते यांचा वरचष्मा

श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर या ठिकाणची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली. या मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विक्रम पाचपुते आणि महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे, राहुल जगताप आणि वंचित आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार अशा पद्धतीची लढत दिसून आली.

Ajay Patil
Published:
vikram pachpute

Ahilyanagar News:- श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितले तर या ठिकाणची निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली. या मतदारसंघातून भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विक्रम पाचपुते आणि महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे, राहुल जगताप आणि वंचित आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार अशा पद्धतीची लढत दिसून आली.

परंतु या सगळ्या झालेल्या चुरशीच्या लढतीत मात्र विक्रम पाचपुते यांनी बाजी मारत विजय खेचून आणला. या विजयामागे जर आपण बघितले तर विक्रम पाचपुते यांच्याकरिता त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी निश्चित झाल्यापासून ते विजयी प्रवासापर्यंतची जी काही गनिमी कावा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली ती खूप फायद्याची ठरली.

श्रीगोंद्यात विक्रम पाचपुते यांचाच बोलबाला
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार आमदार विक्रम पाचपुते यांच्याकरिता त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी निश्चिती झाल्यापासून ते निकालाच्या दिवशी विजय होईपर्यंत गनिमी कावा पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली. विक्रम पाचपुते यांच्या विरोधी अनेक दिग्गज उम्मेदार होते व त्यांनी देखील तितकीच ताकद लावलेली होती.

परंतु श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सगळ्याच ठिकाणहून त्यांना भरभरून असे मताधिक्य मिळाले. विक्रम पाचपुते यांना नगर तालुक्यातील मतदारांनी तब्बल 11 हजार 743 मतांचे मताधिक्य देऊन जणू काही त्यांचा विजयाचा पायाच घातला व श्रीगोंदे करांनी 25 हजार चौऱ्याऐंशी मतांचे मताधिक्य देऊन त्या पायाचा कळस बांधण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली असे म्हटले तरी वावगे ठरू नये.

जेव्हा निवडणूक सुरू झाल्या तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणाची प्रामुख्याने लढत महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे व पाचपुते यांच्यात होईल अशी एक शक्यता होती. परंतु राहुल जगताप यांच्या मागे शरद पवार यांची अदृश्य शक्ती उभी राहिली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णासाहेब शेलार यांची हवा तयार झाली आणि लढतीचा रंग आणखीनच वाढला.

त्यानंतर मात्र ही लढत पाचपुते विरुद्ध राहुल जगताप अशी थेट झाली. विक्रम पाचपुते यांची जमेची बाजू बघितली तर लाडकी बहीण योजना तसेच बबनराव पाचपुते यांनी अडीच वर्षात केलेली विकास कामे खूप महत्त्वाची ठरलेत.

विशेष म्हणजे या निवडणुकीत राहुल जगताप यांचे होम ग्राउंड असलेले येळपणे गटात 935 तर कोळगाव गटात 842 मतांची पाचपुते यांनी आघाडी घेतलेली होती. तसेच नागवडे यांच्या बेलवंडी गटात देखील पाचपुतेंनी 4582 इतकी मताधिक्य घेतले.

विक्रम पाचपुते यांना या ठिकाणी मिळाले सर्वात जास्त मताधिक्य
विक्रम पाचपुते यांना सर्वात जास्त मताधिक्य काष्टी गटात मिळाले होते व ते 10619 इतके होते. तर चिंचोडी पाटील गटात एकूण नऊ हजार 151 मताधिक्य मिळाले. आढळगाव गटात तीन हजार 159, मांडवगण गट 2909, वाळकी गटामध्ये 2512 मतांचे मताधिक्य पाचपुते यांना मिळाले.

तसेच श्रीगोंदा शहरांमधून विक्रम पाचपुते यांना 1988 मतांची आघाडी मिळाली होती. या निवडणुकीमध्ये विक्रम पाचपुते यांना एकूण 99820 मते मिळाली तर राहुल जगताप यांना 62 हजार 664, अनुराधा नागवडे यांना 54 हजार 115, वंचितचे अण्णासाहेब शेलार यांना 28 हजार 70 अशी मते मिळाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe