लक्ष्मीनारायण राजयोग ‘या’ तीन राशींसाठी ठरेल गेमचेंजर! मिळेल भरभरून यश, मिळेल सन्मान आणि बनणार श्रीमंत, तुमची राशी आहे का यात?

ज्योतिष शास्त्राचा मूळ आधार जर आपण बघितला तर तो ग्रहांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा एक प्रभाव असतो असे मानले जाते व नवग्रहांपैकी बुध आणि शुक्र ही शुभ ग्रह असल्याचे मानले गेले आहे.

Ajay Patil
Published:
horoscope

Laxmi Narayan Rajyoga:- ज्योतिष शास्त्राचा मूळ आधार जर आपण बघितला तर तो ग्रहांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर प्रत्येक ग्रहाचा स्वतःचा एक प्रभाव असतो असे मानले जाते व नवग्रहांपैकी बुध आणि शुक्र ही शुभ ग्रह असल्याचे मानले गेले आहे.

जेव्हा जेव्हा शुक्र आणि ग्रहांचा राजकुमार असलेला बुध ग्रह मार्ग बदलत असतो तेव्हा त्याचा परिणाम राशीचक्र, एकंदरीत पृथ्वी आणि मानवी जीवनावर होत असतो. त्याचप्रमाणे जर बघितले तर या नवीन वर्षात शुक्र आणि बुध वेगवेगळ्या वेळी मीन राशीत प्रवेश करणार आहेत व त्यांच्या या प्रवेशामुळे लक्ष्मीनारायण राजयोग तयार होणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर या नवीन वर्षामध्ये व्यवसाय, भौतिक सुख आणि संपत्ती आणि ऐश्वर्य यांचा कारक असलेला शुक्र ग्रह 28 जानेवारी 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करणार असून दुसरीकडे बुद्धिमत्ता आणि वाणीचा कारक म्हणून समजला जाणारा बुध ग्रह 27 फेब्रुवारी 2025 रोजी मीन राशीत संक्रमण करणार आहे व या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. जवळपास पुढील वर्षातील 69 दिवस लक्ष्मी नारायण राजयोग असणार आहे.

लक्ष्मीनारायण राजयोग या राशींसाठी ठरेल फायद्याचा

1- मेष राशी- लक्ष्मीनारायण राजयोग स्थानिकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. या राजयोगामुळे मेष राशींच्या व्यक्तींना करियर आणि बिजनेसच्या क्षेत्रामध्ये बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. या योगामुळे हे व्यक्ती धार्मिक कार्यात आणि प्रवासात सहभागी होऊ शकतात. तसेच उत्पन्नाचे अनेक नवनवीन मार्ग मिळतील व जास्तीत जास्त स्त्रोत निर्माण होतील.

वडिलोपार्जित संपत्तीतून देखील फायदा मिळण्याची शक्यता आहे व समाजात मानसन्मान वाढीस लागेल. गुंतवणूक करायची असेल तर हा कालावधी खूप शुभ राहणार आहे व जे अविवाहित असतील त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो.

2- मीन राशी- लक्ष्मीनारायण राजयोग मीन राशींच्या व्यक्तींसाठी देखील खूप फायद्याचा ठरणार आहे. घरासारख्या प्रॉपर्टी मध्ये जर पैसे गुंतवायचा प्लॅनिंग असेल तर या माध्यमातून फायदा मिळू शकणार आहे. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याला पगार वाढीसोबतच प्रमोशन देखील मिळेल.

समाजात मानसन्मान आणि आदर वाढेल. एखाद्या ठिकाणी जुनी गुंतवणूक केलेली असेल तर त्यातून या कालावधीत चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये व्यवसाय असेल तर तुम्हाला तुमच्या भागीदाराकडून चांगले सहकार्य मिळण्यास मदत होणार आहे.

3- मिथुन राशी- मिथुन राशींच्या व्यक्तींकरिता देखील लक्ष्मीनारायण राजयोग खूप फायद्याचा ठरणार आहे. तुम्ही जर विदेशामध्ये नोकरी शोधत असाल तर तुम्हाला यावेळी चांगल्या ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे. भौतिक सुख समृद्धी मिळू शकते व या काळात प्रवासाचे योग आहेत.

इतकेच नाहीतर नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये चांगला फायदा मिळू शकतो.या कालावधीत तुमच्यासोबत नशीब भक्कमपणे उभे राहिल व या कालावधीत नशिबाची चांगली साथ मिळू शकते. काही दिवसांपासून जर काही कामे रखडली असतील तर त्या कामांना आता गती मिळण्यास मदत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe