संकट टळले! नगर जिल्ह्याकडे येणाऱ्या चक्रीवादळाने बदलली दिशा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि आंध्रच्या विशाखापट्टणम किनारपट्टीवरून अरबी समुद्राकडे निघालेले चक्रीवादळ कालपासून हैदराबादच्या थोडेसे दक्षिणेला सरकले.

त्यामुळे दक्षिण नगर जिल्ह्यातून होणारा त्याचा संभाव्य प्रवास टळला आहे. चक्रीवादळ काल (मंगळवारी) पहाटे विशाखापट्टणम किनारपट्टीवरून हैदराबादमार्गे नांदेड, असा प्रवास करणे अपेक्षित होते.

प्रत्यक्षात ते हैदराबादच्या दक्षिणेला सरकले. त्याचा प्रवास महाराष्ट्राच्या दिशेने सुरू झाला; मात्र नांदेड टळल्याने ते दक्षिण नगर जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्‍यता कमी झाली.

नांदेडऐवजी सोलापूर शहरापासून सुमारे एकशे साठ किलोमीटरवर कर्नाटकच्या सीमेवर आज पहाटे ते केंद्रित झाले होते. दक्षिण नगर जिल्ह्याऐवजी आज (गुरुवारी) ते कर्नाटकातून जत व अक्कलकोट येथून महाराष्ट्रात प्रवेश करील.

सायंकाळी सातारा व वडूज येथे पोहचेल. सातारा व वडूज चक्रीवादळाचे केंद्र असेल. चक्रीवादळ आज (गुरुवारी) सायंकाळी मुंबईच्या दिशेने कूच करायला सुरवात करील.

मात्र, त्याने यापूर्वीच दिशा बदलली असल्याने, मुंबईत न जाता रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी बंदरातून ते अरबी समुद्रात प्रवेश करील. त्याच्या या संभाव्य मार्गात वादळी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment