Business Idea:- बेरोजगारी सारख्या ज्वलंत प्रश्नावर जर मात करायची असेल तर व्यवसायांकडे वळणे काळाची गरज आहे. भारतातील जर उच्चशिक्षित तरुण-तरुणींची संख्या आणि नोकऱ्यांची उपलब्धता यांचे प्रमाण जर पाहिले तर ते तुलनात्मक दृष्ट्या व्यस्त असे आहे. त्यामुळे नोकऱ्या मिळणे जवळपास दुरापास्त झाल्याचे सध्या चित्र आहे.
त्यामुळे कुठल्यातरी छोट्या-मोठ्या व्यवसायात पडून यशाच्या दिशेने वाटचाल करणे खूप गरजेचे आहे. म्हणून आता अनेक जण व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येतात व अनेक उच्चशिक्षित तरुण-तरुणी शेतीपासून तर इतर अनेक व्यवसायांमध्ये आता नशीब आजमावतांना आपल्याला दिसून येत आहेत.
आता व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे सगळ्यात अगोदर व्यवसाय कोणता करावा आणि त्यासाठी लागणारा पैसा या दोन गोष्टी मुख्यतः डोक्यात येतात व त्या दृष्टिकोनातून सगळ्या प्लॅनिंग केल्या जातात. यामध्ये व्यवसाय कोणता करावा? याबाबत मात्र बऱ्याच जणांचा गोंधळ उडतो.
कारण छोट्या मोठ्या अशा व्यवसायांची यादी जर पाहिली तर ती खूप मोठी आहे व यातून कमी गुंतवणुकीत सुरू करता येईल व चांगला नफा मिळेल अशा व्यवसायाच्या शोधात प्रत्येक जण असतात.
अशाच प्रकारे तुम्हाला देखील व्यवसाय करायचा असेल व कमी गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवायचा असेल तर या लेखामध्ये आपण अशाच एका फायदेशीर व्यवसायाची माहिती थोडक्यात बघणार आहोत.
कमी गुंतवणुकीत बँक फ्रेंचायझी व्यवसाय देईल तुम्हाला लाखोत नफा
कमी गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवायचा असेल तर बँक फ्रेंचायझी व्यवसाय खूप फायद्याचा असून तुम्ही अगदी घरी बसून देखील या माध्यमातून चांगला नफा मिळवू शकतात. या व्यवसायातून तुम्ही पगार आणि कमिशन अशा दोन्ही स्वरूपामध्ये पैसे मिळवू शकतात. फायनान्स क्षेत्रामध्ये ज्यांना काम करण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा व्यवसाय खूप फायद्याचा ठरू शकतो.
तुम्ही जर बँक फ्रॅंचाईजी उघडली तर तुम्हाला बँकेत खाते उघडणे, विविध कर्जाचे वाटप तसेच चेक डिपॉझिट, मनी ट्रान्सफर आणि इतर आर्थिक सेवा व उत्पादनांची विक्री करता येते व या माध्यमातून तुम्हाला चांगले कमिशन मिळते व इतकेच नाहीतर निश्चित पगार देखील मिळू शकतो.
या व्यवसायातून विविध बँकिंग सेवांच्या माध्यमातून कमिशन मिळते व कर्ज तसेच ठेवी, इतर आर्थिक उत्पादनाची विक्री व यासोबत बँकांकडून पगार देखील मिळतो. घरबसल्या अशा पद्धतीने तुम्ही जर ग्राहकांना बँकिंग सेवा दिल्या तर तुम्हाला याकरिता मोठी गुंतवणूक देखील करावी लागत नाही. छोटेसे ऑफिस यासाठी आवश्यक ठरते.
या व्यवसायामध्ये संबंधित बँकेकडून तुम्ही आवश्यक ती ट्रेनिंग घेऊन या व्यवसायाचा श्री गणेशा करू शकतात. तसेच याचे महत्त्व म्हणजे तुम्ही बँक फ्रॅंचायझीच्या माध्यमातून काम सुरू करत असल्याने तुमचा वेळ आणि खर्च देखील वाचतो.
बँक फ्रेंचाईजी व्यवसायामध्ये जर तुम्ही लोकप्रिय आणि विश्वासार्ह बँक निवडली असेल तर तुम्हाला आयुष्यभर हा व्यवसाय करता येऊ शकतो. कारण प्रतिष्ठित आणि लोकप्रिय असलेल्या बँकांकडे आधीपासूनच मोठा ग्राहक वर्ग असतो व त्यामुळे तुम्हाला फायदा होतो व तुमची कमाई स्थिर राहते.
बँक फ्रॅंचायझी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी पूर्ण कराव्या लागतात?
बँकांच्या माध्यमातून अशा प्रकारे फ्रेंचाईजी उघडण्यासाठी ज्या ठिकाणी लोकांना आर्थिक सेवांची जास्त गरज आहे अशा ठिकाणांना बँकांकडून प्राधान्य दिले जाते. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर प्रत्येक बँक फ्रेंचाईजीला वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक लागू शकते गुंतवणुकीची रक्कम बँकेच्या नियमानुसार बदलू शकते.
आता काही व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतांची आवश्यकता देखील असू शकते. तुमच्याकडे जर वित्तीय सेवांमधील अनुभव असेल तर खूप मोठा फायदा होतो. याशिवाय तुमच्याकडे जर बँकेच्या ग्राहकांची संख्या मोठी असेल तर एक किंवा दोन कर्मचारी तुम्हाला तुमच्यासोबत घेणे गरजेचे ठरते.
कशा पद्धतीने सुरू करता येतो बँक फ्रेंचायझी व्यवसाय?
देशातील बऱ्याच बँका त्यांच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर फ्रेंचायझी योजनांची माहिती देत असतात. अशावेळी तुम्ही अर्ज करू शकतात किंवा संबंधित बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतात. तुम्हाला जर आर्थिक व बँकिंग क्षेत्राची आवड असेल तर घरी बसून तुम्ही या व्यवसायातून लाखोत पैसा मिळवू शकतात.