Budget Car In India:- आता काही दिवसांनी नवीन वर्षाचे आगमन होणार आहे आणि या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण वाहनांची खरेदी करण्याला प्राधान्य देतात. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन घरे किंवा वाहने खरेदी केली जातात. वाहनांच्या दृष्टिकोनातून बघितले तर बाईक्स आणि कार घेण्याला मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते.
तुम्हाला देखील या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर नवीन परवडणारी म्हणजेच तुमच्या बजेटमध्ये कार घ्यायची असेल तर या लेखात दिलेली काही कार्स बद्दलची माहिती तुम्हाला फायद्याची ठरू शकते.
सध्या ग्राहक मोठ्या प्रमाणावर बजेट फ्रेंडली आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या कार घेण्याला मोठ्या प्रमाणावर पसंती देतात. त्यामुळे याच पद्धतीच्या काही महत्त्वाच्या असलेल्या कार मॉडेल बद्दल आपण या लेखात माहिती घेणार आहोत.
या आहेत परवडणाऱ्या दरातील आकर्षक अशा कार
1- महिंद्रा XUV 3XO- जर आपण गेल्या काही महिन्यांचा विचार केला तर यामध्ये महिंद्रा XUV 3XO ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात विकली जाणारी एसयूव्ही आहे.
या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत जर बघितली तर ती टॉप मॉडेलसाठी सात लाख 79 हजार रुपये पासून तर पंधरा लाख 49 हजार रुपयापर्यंत आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या कारला पाच स्टार रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे तुम्हाला जर कार घ्यायची असेल तर ही कार देखील महत्त्वाचे ठरू शकते.
2- स्कोडा कायलॅक- स्कोडाने अलीकडेच Kylaq नावाची पहिली कॉम्पॅक्ट एसयुव्ही लॉन्च केली आहे. जर आपण या कारची भारतीय बाजारपेठेतील एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती सात लाख 89 हजार रुपये आहे.
या कारमध्ये कंपनीने अनेक अत्याधुनिक अशी वैशिष्ट्ये दिलेली आहेत. या कारमध्ये कंपनीने 10.1 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली आहे.
3- होंडा अमेझ- ही कार देखील काही दिवसांपूर्वीच तिच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आलेली आहे. होंडा अमेझ या कारची भारतीय बाजारपेठेतील एक्स शोरूम किंमत आठ लाख रुपये आहे व टॉप मॉडेल करिता दहा लाख 90 हजार रुपयांपर्यंत ती जाते.
या कारमध्ये स्वयंचलित हवामान नियंत्रण आणि एडीएएस तंत्रज्ञान देण्यात आले आहे व त्यासोबतच एलईडी लाइटिंग सारखे इतर अनेक वैशिष्ट्ये या कारमध्ये आहेत.
4- किया सोनेट- किया सोनेट ही भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही पैकी एक आहे. या कारमध्ये ग्राहकांना लेव्हल-1 ADAS तंत्रज्ञानासह इलेक्ट्रिक सनरूफ, सुरक्षिततेकरिता सहा एअरबॅग्स आणि 360 डिग्री कॅमेरा सारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेले आहेत. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत भारतीय बाजारपेठेत 8 लाख ते 15.7 लाख रुपयापर्यंत आहे.