Download Process Of New pan card 2.0:- केंद्र सरकारच्या माध्यमातून डिजिटल इंडिया अंतर्गत पॅन कार्डला नवीन रूप देण्यात आले असून त्याला पॅन 2.0 असे नाव देण्यात आलेले आहे. हे पॅन कार्ड खूप महत्त्वाचे असणारा असून यामध्ये क्यूआर कोड देण्यात येणार आहे.
या वैशिष्ट्यामुळे हे पॅन कार्ड अगोदरच्या पॅन कार्डपेक्षा अधिक सुरक्षित आणि डिजिटल फ्रेंडली असणार आहे.तसेच याचे अजून एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सध्या अस्तित्वात असलेले पॅन कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला बरेच दिवस वाट पहावी लागत होती. परंतु आता हे नवीन क्यूआर कोड असलेले पॅन कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला वाट पाहण्याची गरज नाही.
हे पॅन कार्ड तुम्ही अगदी तुमच्या ईमेलवर ताबडतोब डाऊनलोड देखील करू शकतात. त्यामुळे या लेखात हे पॅन कार्ड नेमके काय आहे व त्याचे फायदे काय? ई-मेलवर कसे डाऊनलोड करावे? इत्यादी बद्दल माहिती बघू.
पॅन 2.0 म्हणजे नेमके काय?
हे एक डिजिटल पॅनकार्ड असून त्यामध्ये क्यूआर कोड असणार आहे. हे नवीन पॅन कार्ड पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक असणार आहे व तुम्हाला लगेच ते जारी केले जाणार आहे. तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड संबंधित सर्व माहिती या क्यूआर कोडमध्ये पाहता येणार आहे व या कोडमध्ये सर्व तपशील सुरक्षितपणे इन्क्रिप्ट केले जाणार आहे.
या नवीन डिजिटल पॅन कार्डचा उद्देश पाहिला तर तो सध्याच्या भौतिक कार्डावरील अवलंबित्व कमी करणे व पॅन कार्ड अधिक सुरक्षित आणि पर्यावरण पूरक करणे हा आहे. जसे अगोदरचे पॅन कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागत होती.
आता ती समस्या मिटणार असून हे नवीन पॅन कार्ड तुम्हाला ईमेलवर त्वरित उपलब्ध केले जाणार आहे.तसेच क्यूआर कोड सह फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी असल्याने एक डिजिटल सुरक्षा यामुळे मिळणार आहे. तसेच क्यूआर कोड स्कॅन करून पॅनची पडताळणी सहजपणे करता येणार आहे.
कसा कराल नवीन पॅन 2.0 मिळवण्याकरिता अर्ज?
आयकर विभागाच्या माध्यमातून या नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय सोपी आणि सुलभ व डिजिटल करण्यात आलेली आहे. या नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करताना सगळ्यात अगोदर तुम्हाला…..
1- आयकर विभागाच्या ई-पॅन पोर्टलवर जावे लागेल व त्या ठिकाणी होम पेजवर असलेल्या अप्लाय फॉर इन्स्टंट पॅन या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
2- त्यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल व आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल व आलेला हा ओटीपी दिलेल्या ठिकाणी तुम्हाला नमूद करावा लागेल.
3- त्यानंतर तुमचा योग्य ई-मेल आयडी आणि इतर आवश्यक माहिती भरावी व तुमचा आधार आणि मोबाईल नंबर पॅन कार्डची लिंक असल्याची खात्री करावी.
4- अर्ज पूर्ण केल्यानंतर काही मिनिटात तुमचे हे पॅन कार्ड तुमच्या ईमेलवर पाठवले जाईल व तुम्ही ते पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करू शकतात.
5- या पॅन कार्ड साठी लागणाऱ्या शुल्काचा विचार केला तर एखाद्या वेळेस नाममात्र स्वरूपात शुल्क आकारले जाऊ शकते. परंतु विद्यमान पॅन कार्डधारक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पॅन 2.0 वर अपग्रेड करू शकतात.