कमी बजेटमध्ये छोट्या कुटुंबासाठी सनरूफ कार घेण्याचे स्वप्न होईल पूर्ण! ‘या’ कार ठरतील बेस्ट ऑप्शन

जेव्हा कोणीही कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा प्रत्येकाची इच्छा एकच असते की कमी बजेटमध्ये उत्तम अशी वैशिष्ट्ये असलेली कार आपल्याला मिळावी. दुसरे म्हणजे आपल्या कुटुंबाचा देखील यामध्ये विचार केला जातो. म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे याचा देखील विचार केला जातो.

Ajay Patil
Published:
sunroof car

Low Budget Sunroof Car In India:- जेव्हा कोणीही कार खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा प्रत्येकाची इच्छा एकच असते की कमी बजेटमध्ये उत्तम अशी वैशिष्ट्ये असलेली कार आपल्याला मिळावी. दुसरे म्हणजे आपल्या कुटुंबाचा देखील यामध्ये विचार केला जातो. म्हणजे आपल्या कुटुंबातील सदस्य संख्या किती आहे याचा देखील विचार केला जातो.

कारण आपण जी काही कार घेणार आहोत त्यामध्ये आपले कुटुंब आरामात कुठे जायचे राहिले म्हणजे आरामात बसू शकतील हा देखील यामागे दृष्टिकोन असतो.या सगळ्या गोष्टींचा विचार करून कारची निवड केली जाते. तसेच काही विशेष फीचर्स देखील बघितले जातात व त्यामध्ये सनरूफ असलेली कार घेण्याला देखील प्राधान्य दिले जाते.

जर आपण भारतीय कार बाजारपेठ बघितली तर यामध्ये अनेक सनरूफ असलेल्या कार उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील जर कमी बजेटमध्ये सनरूफ असलेली कार घ्यायची असेल तर या लेखामध्ये आपण काही कमी बजेटमधील कारची माहिती घेणार आहोत.

या आहेत कमी बजेटमधील सनरूफ कार

1- मारुती सुझुकी डिजायर- मारुती सुझुकी ही भारतातील अग्रगण्य आणि ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली कार उत्पादक कंपनी असून या कंपनीच्या अनेक कार्सना ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. यामध्ये मारुती सुझुकी डिजायर या कारला देखील ग्राहकांनी आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आहे

व तितकीच ही कार ग्राहकांमध्ये प्रसिद्ध देखील आहे. तुम्हाला देखील सनरूफसह मारुती सुझुकी डिजायर खरेदी करायची असेल तर या कारचे टॉप स्पेस ZXI प्लसमध्ये हे वैशिष्ट्य उपलब्ध आहे. ही कार तुम्हाला 9.7 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत मिळते.

2- टाटा पंच- ज्याप्रमाणे मारुती सुझुकी कंपनीच्या कार्सला मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून पसंती दिली जाते. अगदी त्याचप्रमाणे टाटा मोटर्सच्या देखील कार भारतामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत. टाटा मोटरच्या ज्या काही कार आहेत त्यामध्ये टाटा पंच ही कार देखील तितकीच लोकप्रिय आहे.

टाटा पंच ही टाटा मोटरची एक मायक्रो एसयूव्ही कार असून तुम्हाला जर टाटा पंच सनरूफ फीचर्ससह घ्यायची असेल तर टाटा पंचच्या अडवेंचर S ट्रीममध्ये सनरूफ पर्याय उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7.6 लाख रुपये इतकी आहे.

3- टाटा अल्ट्रोज- टाटा पंचच नाहीतर टाटाच्या अल्ट्रोस या कारमध्ये देखील तुम्हाला सनरूफ हा पर्याय उपलब्ध आहे. टाटा अल्ट्रोज मधील XMप्लस S ट्रिम मध्ये तुम्हाला सनरूफ पर्याय मिळतो. जर तुम्हाला टाटा अल्ट्रोज सनरूफ फीचर्स असलेली कार असेल तर त्या कारची एक्स शोरूम किंमत 7.7 लाख रुपये इतकी आहे.

4- ह्युंदाई एक्सेटर- टाटा आणि मारुती सुझुकी या कार उत्पादक कंपन्यांप्रमाणे ह्युंदाई या कंपनीच्या कार देखील तितक्याच प्रसिद्ध आहेत. तुम्हाला जर ह्युंदाई कंपनीची सनरूफ कार घ्यायची असेल तर ह्युंदाई एक्सेटरच्या टॉप स्पेस SX प्रकारामध्ये इलेक्ट्रिक सनरूफ पर्याय उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 8.2 लाख रुपये इतकी आहे.

5- टाटा नेक्सन- टाटा मोटरच्या ज्या कार आहेत त्यापैकी टाटा नेक्सन ही प्रचंड अशी लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली कार आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून देखील ही कार खूप महत्त्वपूर्ण समजली जाते.

तुम्हाला जर टाटा नेक्सन मधील सनरूफ मॉडेल घ्यायचे असेल तर तुम्हाला ते स्मार्ट प्लस S ट्रिममध्ये उपलब्ध आहे व या कारची एक्स शोरूम किंमत नऊ लाख रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe