Health Tips:- सध्या सगळीकडे थंडीचा कडाका जाणवायला लागला असून अजून तरी साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडी जाणवेल व या हिवाळ्याच्या कालावधीमध्ये अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या देखील उद्भवतात. आरोग्याच्या समस्येच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर हिवाळ्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास हा मोठ्या प्रमाणावर होत असतो.
सर्दीमुळे तर व्यक्ती अतिशय त्रस्त होते. या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी दूध खूप फायद्याचे ठरू शकते. आपल्याला माहित आहे की दूध हे अनेक जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असून त्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 तसेच विटामिन डी, कॅल्शियम, प्रथिने तसेच मॅग्नेशियम आणि फॅटी ऍसिड यासारखे पौष्टिक घटक मोठ्या प्रमाणावर असतात.
या सगळ्या दृष्टिकोनातून जर तुम्ही दुधामध्ये काही पदार्थ मिसळून जर ते दूध हिवाळ्यामध्ये पिले तर सर्दी तर दूर राहतेच परंतु इतर काही आरोग्य विषयक समस्यांपासून देखील मुक्तता मिळते.
दुधाबरोबर हे पदार्थ मिसळून दूध प्या, होतील अनेक फायदे
1- दुधामध्ये हळद मिसळणे- हळद ही औषधी गुणधर्मांनी युक्त असून ती दाहक विरोधी, अँटी बॅक्टेरियल आणि अँटिऑक्सिडंट या गुणधर्मांनी समृद्ध समजली जाते. अशा परिस्थितीमध्ये जर दुधामध्ये हळद टाकून जर पिले तर सर्दी खोकल्यापासून आराम तर मिळतोच परंतु त्याचा हिवाळ्यामध्ये त्वचेला देखील फायदा होतो.
हिवाळ्यामध्ये सांधेदुखीचा त्रास वाढण्याची शक्यता असते व या सांधेदुखीवर देखील हा एक रामबाण उपाय आहे. हळद मिसळून दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
2- दुधात सुंठ मिसळणे- सुंठ हा देखील एक महत्त्वाचा पदार्थ असून अनेक घरगुती प्रभावी उपायांसाठी सुंठाचा वापर केला जातो. सर्दी तसेच खोकला व ताप या सामान्य आजारांपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी सुंठ फायद्याचे समजले जाते.
दुधामध्ये जर सुंठ टाकून ते दूध पिले तर घसादुखी आणि घशावर सूज आल्यास त्यावर पटकन आराम मिळतो. इतकेच नाही तर पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी देखील ते फायद्याचे आहे. याकरिता कोमट दुधामध्ये दोन चमचे सुंठ पावडर टाकून पिले तर सर्दी खोकल्यासारखी आरोग्याची समस्या दूर होते.
3- दुधात केशर मिसळणे- दुधामध्ये जर केशर टाकले तर शरीराला ऊर्जा आणि ताजेपणा मिळतो. कारण केशरमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात व त्यामुळे शरीराला आतून फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होतो.
तसेच महत्त्वाचे म्हणजे दुधामध्ये केशर टाकून दूध पिल्यामुळे शरीराचा थकवा देखील दूर होतो. इतकेच नाही तर दुधाची चव देखील चांगली होण्यास मदत होते.
4- दुधामध्ये बदाम आणि मनुके मिसळणे- दुधामध्ये जर मनुके आणि बदाम उकळून पिले तर हिवाळ्यामध्ये शरीर आतून उबदार राहण्यास मदत होते व शरीराला ऊर्जा देते व शरीर ताजेतवाने राहते. तसेच बदामामध्ये विटामिन ई, फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असते व यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत होते.