FD Interest Rate:- फिक्स डिपॉझिट म्हणजे एफडी हा गुंतवणुकीचा एक विश्वासहार्य आणि लोकप्रिय असा पर्याय असून विविध बँकांच्या माध्यमातून आणि पोस्ट ऑफिस आकर्षक अशा एफडी योजना राबवते. आपल्याला माहित आहे की गुंतवणुकीची सुरक्षितता आणि निश्चित परतावा मिळण्याच्या दृष्टिकोनातून एफडीत गुंतवणूक करायला प्राधान्य दिले जाते.
एफडी केल्यावर जे काही व्याज मिळते ते तुम्ही किती कालावधीकरिता एफडी करत आहात त्यावर अवलंबून असते. वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर दिला जातो. बँकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर ज्याप्रमाणे सरकारी बँकांमध्ये एफडी योजना राबवल्या जातात.
अगदी त्याचप्रमाणे खाजगी बँकांच्या माध्यमातून देखील एफडीवर चांगले व्याजदर दिले जातात. यामध्ये प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेगळे असतात व त्यामुळे अशा बँकेमध्ये एफडी करणे गरजेचे आहे ज्या ठिकाणी तुम्हाला जास्त व्याजदर मिळेल.
त्यामुळे या लेखात आपण अशा काही बँकांची माहिती घेणार आहोत ज्या ठिकाणी तुम्ही एक वर्षाच्या कालावधीकरिता एफडी केली तर सर्वाधिक व्याजदर मिळतो व साहजिकच त्या माध्यमातून तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो.
एक वर्षाच्या एफडीवर या बँका देतात सर्वाधिक व्याजदर
1- बंधन बँक- बंधन बँक ही खाजगी क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध अशी बँक असून या बँकेमध्ये जर तुम्ही एक वर्ष कालावधीसाठी एफडी केली तर तुम्हाला 8.05 टक्के इतके व्याज मिळते. त्यामुळे साहजिकच एक वर्ष कालावधीच्या एफडीवर तुम्हाला परतावा देखील चांगला मिळतो.
2- इंडसइंड बँक- इंडसइंड बँक देखील एफडी करण्यासाठी खूप फायद्याची असून या बँकेत जर तुम्ही एक वर्ष कालावधीसाठी एफडी केली तर बँकेच्या माध्यमातून 7.75 टक्के इतके व्याज दिले जाते.
3- आरबीएल बँक- आरबीएल बँक देखील एक वर्षाच्या एफडीवर चांगले व्याज देते व या माध्यमातून एक वर्षाचे एफडीवर चांगला परतावा मिळणे शक्य आहे. आरबीएल बँक एक वर्षाच्या एफडीवर साधारणपणे 7.5% इतक्या व्याजदरानुसार परतावा देते.
4- येस बँक- येस बँक देखील एक वर्षाच्या एफडीवर चांगला असा व्याजदर देते व तुम्ही जर एक वर्षाच्या कालावधीकरिता येस बँकेमध्ये एफडी केली तर त्यावर तुम्हाला 7.25% इतका व्याजदर मिळतो.
5- कोटक महिंद्रा बँक- कोटक महिंद्रा बँकेच्या माध्यमातून देखील एक वर्षाच्या मुदतीच्या एफडीवर उत्तम असा व्याजदर दिला जातो. तुम्ही जर कोटक महिंद्रा बँकेमध्ये एक वर्षाच्या मुदतीसाठी एफडी केली तर तुम्हाला 7.1% इतके व्याज मिळते.