Bajaj CT 110X Bike:- आज मोठ्या प्रमाणावर बाईकचा वापर आपल्याला होताना दिसून येतो.साधारणपणे आज प्रत्येक व्यक्तीकडे आपल्याला बाईक दिसते व अनेक कामांसाठी बाईकचा वापर होत असल्यामुळे ग्राहक वर्ग देखील मोठा आहे.त्या अनुषंगाने जर आपण बघितले तर भारतामध्ये अनेक बाईक उत्पादक कंपन्यांनी देखील वेगवेगळे वैशिष्ट्य असलेले अनेक बाइक्स बाजारपेठेत लॉन्च केलेले आहेत.
यामध्ये स्कूटर तसेच बाईक व स्पोर्ट बाईक इत्यादींचा आपल्याला समावेश करता येईल. तसेच दुसरे महत्त्वाचे म्हणजे बाईक घेणे अतिशय सोपे आणि सुलभ झाले आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे अनेक बँकांच्या माध्यमातून बाईक खरेदीवर लोन उपलब्ध करून दिले जाते व हे लोन ग्राहक सुलभ हप्त्यामध्ये परतफेड करू शकतात.
या अनुषंगाने जर तुम्हाला उत्तम मायलेज देणारी आणि दमदार अशी बाईक घ्यायची असेल व ती देखील लोन वर तर या लेखामध्ये आपण अशाच एका बजाजच्या बाईकची माहिती घेणार आहोत जी तुम्ही अतिशय कमीत कमी डाऊन पेमेंट करून घरी आणू शकतात.
दहा हजार रुपये डाऊन पेमेंट करा आणि बजाज सिटी 110X घरी आणा
ही बजाज कंपनीची बाईक असून बजाज सिटी 110X च्या बेस व्हेरिएंटाची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ती साधारणपणे 70 हजार रुपये आहे व याच बाईकची मुंबईमध्ये ऑन रोड किंमत 85000 च्या आसपास आहे. तुम्हाला जर ही बाईक खरेदी करायची असेल व तुम्ही दहा हजार रुपयांचे डाऊन पेमेंट करणार असाल तर तुम्हाला 75 हजार रुपयांचे लोन यासाठी घ्यावे लागेल.
हे 75 हजार रुपयांचे लोन तुम्हाला 9.7% व्याजदराने तीन वर्षांसाठी मिळते. या हिशोबाने जर बघितले तर तुम्हाला या लोनसाठी दरमहा 2400 रुपयांचा ईएमआय भरावा लागतो. अशा पद्धतीने बजाजची ही बाईक तुम्ही सुलभ हप्त्यामध्ये घरी आणू शकतात.
काय विशेष बजाज सिटी 110X बाईक मध्ये?
कंपनीने या बाईकमध्ये ११५.४५ सीसी सिंगल सिलेंडर एअर कुल्ड इंजिन दिले आहे.इंजिन 7000 rpm वर 8.6 पीएस पावर आणि 5000 rpm वर 9.81 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
तसेच हे इंजिन चार स्पीड गिअरबॉक्सशी कनेक्ट आहे. या बाईकचा कमाल ताशी वेग 90 किलोमीटर असून ही बाईक मॅट वाइल्ड ग्रीन, इबोनी ब्लॅक रेड आणि इबोनी ब्लॅक ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.