Oben Electric Rorr EZ Bike:- सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड भारतामध्ये दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर वाहन उत्पादक कंपन्यांकडून देखील इलेक्ट्रिक कार्स, इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटर्स उत्पादित केल्या जात असून त्या लॉन्च देखील केल्या जात आहेत.भारतामध्ये येणाऱ्या काही दिवसात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर आपल्याला इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसून येतील.
यामध्ये जर आपण इलेक्ट्रिक बाइक बघितल्या तर अनेक वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून उत्तम आणि चांगल्या रेंज असलेल्या बाईक्स लॉन्च करण्यात आलेले आहेत व त्याप्रमाणेच ओबेन इलेक्ट्रिकची ओबेन इलेक्ट्रिक रॉर EZ इलेक्ट्रिक बाइक नुकतीच लॉन्च करण्यात आलेली असून नवीन इलेक्ट्रिक बाइक घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही बाईक एक उत्तम पर्याय ठरू शकते.
या बाईकच्या रेंज बद्दल कंपनीचा दावा बघितला तर त्यांच्यानुसार या बाईकचे टॉप मॉडेल एकदा फुल चार्ज केल्यानंतर कमीत कमी 175 किलोमीटरची रेंज आरामात देऊ शकते. तसेच यापेक्षा लोअर व्हेरियंट हे किंचितशी कमी रेंज देऊ शकते. म्हणजेच ही बाईक तुम्हाला लांबच्या प्रवासासाठी पुन्हा पुन्हा चार्ज करण्याची गरज भासणार नाही.
काय आहे विशेष या इलेक्ट्रिक बाइक मध्ये?
ओबेन इलेक्ट्रिक रॉर EZ या बाईकचा टॉप स्पीड हा 95 किलोमीटर प्रतितास इतका असून ही बाईक 3.3 सेकंदांमध्ये 0 ते 40 किमी प्रतितास चालवता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे या बाईकमध्ये तुम्हाला फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळतो व साधारणपणे 45 मिनिटांमध्ये 80% पर्यंत या बाईकची बॅटरी चार्ज होऊ शकते.
तसेच या बाईकमध्ये तीन रायडिंग मोड देण्यात आले आहेत व राईडची गुणवत्ता सुधारण्यासाठी व चांगल्या रायडिंगचा अनुभव मिळवण्यासाठी हे मोड फायद्याचे आहेत. ही इलेक्ट्रिक बाइक इलेक्ट्रो अंबर, सर्ज सायन, लुमिना ग्रीन आणि फोटॉन व्हाईट या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ही बाईक नियो क्लासिक डिझाईनसह बनवण्यात आली आहे.
किती आहे या बाईकची किंमत?
जर आपण या इलेक्ट्रिक बाइकची किंमत बघितली तर ती मार्केटमध्ये तिच्या विविध व्हेरियंटनुसार वेगवेगळी आहे. या बाईकच्या 2.6 kWh व्हेरियंटच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर ती एक्स शोरूम 89 हजार 999 रुपये तर 3.4 kWh व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 99999 रुपये इतकी आहे. तर 4.4 kWh व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत एक लाख 9 हजार 999 रुपये इतकी आहे.