महिंद्रा थार खरेदी करायची तर कधी नाही येणार अशी संधी! मिळतेय 3 लाख रुपयांपर्यंत सूट

तुम्हाला कार खरेदी करायची असेल आणि तीही मजबूत आणि एकदम डॅशिंग असा लुक असणारी तर अशा प्रकारच्या अनेक कार भारतीय कार बाजारपेठेमध्ये आहेत.परंतु यामध्ये जर ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सगळ्यांची पसंतीची असेल तर ती महिंद्रा थार ही कार होय.

Discount Offer On Mahindra Thar:- तुम्हाला कार खरेदी करायची असेल आणि तीही मजबूत आणि एकदम डॅशिंग असा लुक असणारी तर अशा प्रकारच्या अनेक कार भारतीय कार बाजारपेठेमध्ये आहेत.परंतु यामध्ये जर ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सगळ्यांची पसंतीची असेल तर ती महिंद्रा थार ही कार होय.

महाराष्ट्रमध्ये तरी मोठ्या प्रमाणावर आपल्याला थारप्रेमी दिसून येतात. त्यामुळे अनेक जणांची इच्छा असते की महिंद्रा थार विकत घ्यावी. परंतु या कारची जर सध्याची किंमत पाहिली तर ती एक्स शोरूम अकरा लाखापासून तर जवळपास 17 ते 18 लाख रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे प्रत्येकाला थार खरेदी करणे शक्य होत नाही.

परंतु तुमची आता हे महिंद्रा थार विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार आहे. कारण या महिन्यामध्ये महिंद्राच्या थार तीन डोअर मॉडेलच्या विविध व्हेरियंटवर 56 हजारापासून तर तीन लाख सहा हजार रुपयापर्यंत बंपर सूट दिली जात असून ही सूट डीलरशिप लेव्हलवर दिली जात आहे.

वाचा कोणत्या व्हेरियंटवर मिळत आहे किती सूट?
जर आपण महिंद्रा थार तीन डोअर मॉडेल चे 2WD व्हेरियंट बघितले तर त्यावर चांगले फायदे मिळणार आहेत. या ऑफर अंतर्गत सर्वात कमी फायदा हा थार RWD 1.5 लिटर डिझेल व्हेरिएंटवर मिळत आहे. तसेच पेट्रोल इंजिन पर्यायामध्ये बघितले तर रियर व्हील ड्राईव्ह व्हेरिएंटवर तब्बल एक लाख 31 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे.

तसेच महिंद्रा थार अर्थ एडिशनवर सर्वात जास्त सूट देण्यात येत आहे. डीलरशिप लेव्हलवर ग्राहकांना या महिन्यामध्ये थार तीन डोअर मॉडेलच्या अर्थ एडिशन टॉप स्पेक LX ट्रीप वेरिएंटवर कमाल 3 लाख सहा हजार रुपयापर्यंत सूट मिळेल. अशा पद्धतीने तुम्हाला जर थार खरेदी करायची असेल तर ही एक चांगली संधी आहे.

किती आहे महिंद्रा थारची किंमत?
महिंद्रा अँड महिंद्राची ही एक पावरफुल एसयूव्ही असून सध्या तिची एक्स शोरूम किंमत 11 लाख 35 हजार ते 17 लाख 60 हजार रुपये पर्यंत आहे.

तसेच प्राप्त माहितीनुसार महिंद्रा कंपनी येणाऱ्या वर्षी फेसलिफ्ट अवतारामध्ये थार तीन डोअर मॉडेल लॉन्च करू शकते. या नवीन मॉडेलमध्ये टेल लॅम्प तसेच एलईडी हेड लॅम्प, एकोणावीस इंच अलॉय व्हील तसेच इन्फोटेनमेंट सिस्टम आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर तसेच पॅनोरेमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड सीट्स मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe