लग्नसराईमध्ये लाखो रुपये कमावण्याची संधी देतात ‘हे’ व्यवसाय! एकदा कराल सुरुवात तर आयुष्यभर मिळत राहील पैसा

व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे नेमका कोणता व्यवसाय करावा? मनामध्ये सगळ्यात अगोदर हा प्रश्न येतो. त्यानंतर आपण जो व्यवसाय निवडणार आहात तो व्यवसाय चालेल का किंवा त्याला मागणी आहे का? हा प्रश्न व्यवसाय यशस्वी होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचा आहे व त्यानंतर येतो तो विचार म्हणजे व्यवसायासाठी लागणारे भांडवल होय.

Ajay Patil
Published:
business idea

Business Idea:- व्यवसाय करायचा म्हटला म्हणजे नेमका कोणता व्यवसाय करावा? मनामध्ये सगळ्यात अगोदर हा प्रश्न येतो. त्यानंतर आपण जो व्यवसाय निवडणार आहात तो व्यवसाय चालेल का किंवा त्याला मागणी आहे का? हा प्रश्न व्यवसाय यशस्वी होण्यामागे सगळ्यात महत्त्वाचा आहे व त्यानंतर येतो तो विचार म्हणजे व्यवसायासाठी लागणारे भांडवल होय.

जेव्हा या तीनही गोष्टी आपल्याला जुळवून आणता येतात किंवा निश्चित होतात तेव्हा आपण एखादा व्यवसाय उभा करतो. तसेच दुसरे म्हणजे व्यवसायाची उभारणी किंवा निवड करण्यामागे कमीत कमी गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा आपल्याला कोणत्या व्यवसायातून मिळेल या बाबतीत देखील विचार केला जातो.

तुम्हाला देखील एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही बारकाईने विचार करून आणि चांगली मागणी असलेल्या व्यवसायाची निवड करणे गरजेचे असते.

या अनुषंगाने या लेखामध्ये आपण अशाच काही व्यवसायांची माहिती घेणार आहोत जे लग्न सारखी कार्य तसेच इतर कार्यक्रमांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असतात व त्या माध्यमातून चांगला पैसा मिळवता येतो. त्यामुळे या लेखात आपण अशा व्यवसायांची माहिती बघणार आहोत.

लग्नसराईच्या निमित्ताने करता येणारे व्यवसाय

1- डेकोरेशन म्हणजे सजावट- आपल्याला माहित आहे की लग्न समारंभ म्हटले म्हणजे एखाद्या हॉलमध्ये ते आयोजित केले जाते व हॉल म्हटले म्हणजे त्या ठिकाणी हॉलची सजावट म्हणजेच डेकोरेशन आलेच.

आता अनेक प्रकारच्या थीम ठरवून लोक डेकोरेशन करून घेत असतात. या व्यवसायामध्ये कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे कारण समजून विविध प्रकारचे डेकोरेशन ग्राहकांना देता येणे या व्यवसाय मध्ये गरजेचे आहे.

त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या डेकोरेशनच्या संकल्पना राबवता आल्या पाहिजेत. लग्न असो किंवा बारसे तसेच वाढदिवस, साखरपुड्याचा कार्यक्रम अशा समारंभा नुसार तुम्हाला डेकोरेशनमध्ये बदल करता यायला हवा व त्याविषयीची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

कारण अशा कार्यक्रमांमध्ये जे व्यक्ती पैसा खर्च करतो त्याला काहीतरी वेगळं आणि हटके असे हवे असते. तुम्ही डेकोरेशन हे आर्टिफिशियल किंवा लाईव्ह ओरिजनल फुलांचे किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून करू शकतात व ते तुम्हाला करता येणे गरजेचे आहे.

हीच डेकोरेशन व्यवसाय मधील गरज आहे. डेकोरेशन व्यवसायामध्ये देखील खूप मोठी संधी आहे. डेकोरेशन व्यवसाय हा लग्नाचा हॉलचं नाही तर घर किंवा कार्यालय किंवा इतर ठिकाणी सजावटीसाठी देखील मागणी आहे. हा देखील एक वर्षभर चालू शकतो असा एक व्यवसाय आहे व एक हंगामी स्वरूपात देखील यामध्ये मोठ्या संधी आहेत.

2- हॉल- लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रम म्हटले म्हणजे या कार्यक्रमांना अनेक नातेवाईक आणि मित्रमंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावत असतात. कधीकधी शेकडो ते हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते.

त्यामुळे साहजिकच अशावेळी हॉलचा शोध सुरू होतो व मोठ्या मोकळ्या जागेच्या ज्या ठिकाणी मंडप टाकून लग्न समारंभ साजरा केला जातो. आज अशा स्वरूपात भाड्याने एका दिवसासाठी जागा उपलब्ध करून देताना जागेनुसार 50000 पासून ते एक लाखापर्यंत भाडे आपण आकारू शकतो.

अशा पद्धतीने कार्यक्रमांसाठी हॉलची सोय करताना मात्र जागा ही मोक्याची असणे गरजेचे आहे तसेच त्या ठिकाणी पाण्याची सोय व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देणे ही देखील जबाबदारी तुमची असते. साधारणपणे तुमच्याकडे जर हॉल असेल तर नोव्हेंबर ते मे पर्यंत तुम्ही या माध्यमातून खूप चांगला पैसा कमवू शकतात.

कारण या कालावधीमध्ये लग्न समारंभ मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. लग्नच नाही तर तुम्ही वाढदिवस तसेच बारशाचा कार्यक्रम, साखरपुडा किंवा ओटीभरण इत्यादी कार्यक्रमांसाठी देखील हॉल भाड्याने देऊन बारमही या स्वरूपातून चांगला पैसे मिळू शकतो.

3- केटरिंग- केटरिंग हा एक मोठा व्यवसाय असून यामध्ये संधी देखील खूप मोठे आहेत. भारतामध्ये हजारो प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात व प्रत्येक ठिकाणाचे खाद्यपदार्थांमध्ये आपल्याला भिन्नता दिसून येते. भारतीय परंपरेमध्ये घरी पाहुणे आले तरी त्याला आपण पोटभर जेवू घालतो आणि ही आपली संस्कृती आहे.

अशाच पद्धतीने लग्न सारख्या समारंभांमध्ये पाहुण्यांना आमंत्रित केले जाते व त्यांच्यासाठी जेवणाचे नियोजन देखील केले जाते. जर लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांना जास्त प्रमाणामध्ये पाहुणे निमंत्रित केले असतील तर अशावेळी आपल्याला केटरर्सची मदत घ्यावी लागते व त्यामुळे केटरिंग या व्यवसायाला खूप मागणी आहे.

चांगली चव तसेच पौष्टिक आहार आणि विविध पदार्थ याकरिता केटरिंग व्यवसायावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. केटरिंग व्यवसायामध्ये व्यवसायाला लग्न समारंभ असो किंवा बारसे तसेच मुंज, वाढदिवसाच्या कार्यक्रम, साखरपुड्याचा कार्यक्रम व त्यासोबत इतर पार्टी अशा अनेक ठिकाणी केटरिंग उद्योगाला चांगली संधी असल्याने या व्यवसायाची निवड तुम्ही करू शकतात.

4- डिझायनर कपडे भाड्याने देण्याचा व्यवसाय- यामध्ये डिझायनर कपडे म्हणजे एकच पीस जो युनिक आणि इतर कपड्यांपेक्षा वेगळा असतो. अशा प्रकारच्या कपड्यांना आता खूप मागणी आहे व विशेषतः लग्न समारंभामध्ये प्रत्येकालाच आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे ही इच्छा असते व त्यामुळे आपल्या कपड्यांवर रंगसंगतीवर आणि त्याच्या डिझाईनवर विशेष लक्ष दिले जाते.

तसेच अशा प्रकारच्या डिझायनर कपड्यांची किंमत देखील जास्त असते. अशा प्रकारचे कपडे एकदाच अशा समारंभांमध्ये वापरले जातात व त्यामुळे नंतर ते असेच राहतात. त्यानंतर आपण केलेला खर्च आपल्या लक्षात येतो. त्यामुळे लोक आता याबाबत सावध झाले असून कार्यक्रमांसाठी एक दिवसाकरिता कपडे भाड्याने घेतात.

यामध्ये ग्राहकाचा देखील फायदा असतो आणि व्यावसायिकाला देखील त्याचे भाडे मिळते. लग्न समारंभच नाहीतर इतर अनेक कार्यक्रमांमध्ये देखील अशा विविध डिझायनर कपड्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. जर तुम्ही व्यवस्थित संशोधन किंवा अभ्यास करून जर या व्यवसायाकडे गेला तर खूप मोठी उद्योग संधी यामध्ये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe