Majhi Ladki Bahin Yojana:- महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे काही मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले त्यामागे या योजनेचा खूप मोठा हातभार असल्याचे बोलले जात आहे.
आपल्याला माहित आहे की या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलेच्या खात्यामध्ये प्रतिमाह 1500 रुपये जमा केले जातात व आतापर्यंत साधारणपणे नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते जमा करण्यात आले असून आतापर्यंत जवळपास 7500 रुपयांचा लाभ महिलांना मिळाला आहे व आता महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर आता या योजनेच्या बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे व ती म्हणजे आज नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे व यामुळे आता डिसेंबरचा हप्ता लवकरात लवकर लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होईल अशी एक शक्यता आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महायुती सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आजपासून नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली व आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दुहेरी स्वरूपाची भेट दिली आहे.
आज सरकारच्या माध्यमातून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी साधारणपणे 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या व त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता तब्बल 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतकेच नाही तर बळीराजा विज सवलत योजना करता तीन हजार पन्नास कोटी रुपये, सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ते व पुलांची बांधणी याकरिता एक हजार पाचशे कोटी रुपये,
मोदी आवास घरकुल योजनेकरिता 1250 कोटी रुपये, मुंबई मेट्रो करिता अर्थ सहाय्य म्हणून 1212 कोटी रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकरिता 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महिलांच्या दृष्टिकोनातून महत्वाची असलेली लाडकी बहिणी योजनेकरिता चौदाशे कोटी आणि अन्नपूर्णा योजनेसाठी 514 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने लवकरच आता या योजनेचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.