छोट्या स्टेप फॉलो करा आणि क्रेडिट कार्ड वरून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करा! परंतु जाणून घ्या त्या अगोदर महत्त्वाच्या गोष्टी

जर आपण बघितले तर क्रेडिट कार्डचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. क्रेडिट कार्डमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची खरेदी करण्याची चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध होते व आपल्याला हव्या त्या वस्तू किंवा सेवा आपण खरेदी करू शकतो.

Ajay Patil
Published:
credit card

Fund Transfer from Credit Card to Bank Account:- जर आपण बघितले तर क्रेडिट कार्डचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. क्रेडिट कार्डमुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची खरेदी करण्याची चांगल्या प्रकारची सोय उपलब्ध होते व आपल्याला हव्या त्या वस्तू किंवा सेवा आपण खरेदी करू शकतो.

परंतु आपल्याला माहित आहे की क्रेडिट कार्ड च्या बाबतीत वेळेवर पेमेंट करणे खूप गरजेचे असते. नाहीतर सोयीचे किंवा फायद्याचे ठरणारे हे क्रेडिट कार्ड केंव्हा आपल्याला कर्जाच्या जाळ्यात अडकवते हे आपल्याला कळत देखील नाही. व्यवस्थित आर्थिक नियोजन करून जर क्रेडिट कार्ड वापरले तर क्रेडिट कार्डचे अनेक फायदे आपल्याला मिळतात.

अगदी त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जे काही पैसे असतात ते आपण बँक खात्यात हस्तांतरित म्हणजे ट्रान्सफर देखील करू शकतो. ते कसे ट्रान्सफर करावे किंवा याबद्दलचे काय नियम आहेत? हे या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ.

क्रेडिट कार्डमधून केव्हा बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करता येतात?
तुम्हाला जर क्रेडिट कार्डमधून बँक खात्यामध्ये पैसे जमा करायचे असतील तर याकरिता तुमचे क्रेडिट कार्ड प्रदाते यांच्याकडून कॅश ऍडव्हान्स सुविधा देणे गरजेचे असते. जेव्हा क्रेडिट कार्ड प्रदाते कॅश ऍडव्हान्स सुविधा देतात त्यामुळे व्यक्ती क्रेडिट कार्ड मधून पैसे काढून ते पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करू शकते.

हा एक कर्ज घेण्यासारखाच प्रकार आहे. म्हणजे क्रेडिट कार्ड वरून जे पैसे आपण ट्रान्सफर करतो त्या पैशावर क्रेडिट कार्ड देणारा प्रदाता हा व्याज आकारतो. अशाप्रकारे जेव्हा तुम्ही कॅश ऍडव्हान्स ही सुविधा वापरतात तेव्हा घेतलेली कॅश ऍडव्हान्स किती वेळात परतफेड करतात त्यावर व्याजाचा दर अवलंबून असतो.

यामध्ये लक्षात घेण्याची बाब अशी आहे की, सर्वच क्रेडिट कार्ड प्रदाते तुम्हाला क्रेडिट कार्ड मधून बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देत नाही.

तुम्हाला जर क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करायचे असतील तर त्या अगोदर तुम्ही हे पाहणे गरजेचे आहे की कार्ड देणारा प्रदाता अशी सुविधा देतो का आणि अशी सुविधा उपलब्ध असल्यास तुम्ही क्रेडिट कार्ड वरून पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करू शकतात.

क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात कसे ट्रान्सफर करावे पैसे?

1- मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करून- तुमचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेच्या मोबाईल बँकिंगचा किंवा मोबाईल ॲप्सचा वापर करून तुम्ही अशा पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकतात. याकरिता तुम्हाला सगळ्यात अगोदर…

1- तुमच्या बँकेच्या एप्लीकेशन मध्ये तुम्हाला लॉगिन करावे लागेल आणि त्या ठिकाणी असलेल्या ऍड मनी किंवा ट्रान्सफर फंड हा पर्याय शोधावा लागेल.

2- अशाप्रकारे लॉगिन केल्यानंतर ऍड मनी किंवा ट्रान्सफर फंड हा पर्याय शोधल्यानंतर त्या ठिकाणी फ्रॉम क्रेडिट कार्ड हा पर्याय निवडावा आणि ट्रान्सफर करायची रक्कम टाकावी.

3- त्यानंतर ट्रांजेक्शन डिटेल्स चेक करावी आणि ट्रान्सफर कन्फर्म करावे.

4- अशा सोप्या पद्धतीने तुम्ही ट्रांजेक्शन केल्यानंतर कार्ड वरून पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतात.

क्रेडिट कार्डमधून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याचा ऑफलाईन मार्ग

1- बँकेत जाऊन पैसे ट्रान्सफर करणे- याकरिता तुम्ही सगळ्यात अगोदर तुम्हाला क्रेडिट कार्ड देणाऱ्या किंवा क्रेडिट कार्ड प्रदाताच्या बँकेत जावे. त्यानंतर त्या ठिकाणी फंड ट्रान्सफर फॉर्म भरून सबमिट करावा.

या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी क्रेडिट कार्डचा नंबर तसेच कार्डची एक्सपायरी डेट तसेच बँकेचे नाव तसेच खाते क्रमांक इत्यादी द्यावे लागते. अशाप्रकारे बँक तुमच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करते.

2- एटीएमचा वापर करून- तुम्ही जवळच्या एटीएममध्ये जाऊन( तुमचे ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड असेल त्या बँकेच्या एटीएम मध्ये) क्रेडिट कार्ड वरचे पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करता येतात. याकरिता…

1- अगोदर क्रेडिट कार्ड एटीएम मशीन मध्ये इन्सर्ट करावे.

2- एटीएम मशीनच्या स्क्रीनवर कॅश ऍडव्हान्स हा पर्याय निवडावा आणि तुमच्या क्रेडिट कार्डला जोडलेले बँक खाते निवडावे. यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्डला जोडल्या नसलेल्या बँक खात्यात देखील पैसे ट्रान्सफर करू शकतात. त्यासाठी तुम्हाला पैसे काढून ते तुमच्या बँक खात्यात जमा करावे लागतील.

3- त्यानंतर ट्रान्सफर करायची रक्कम टाकावी आणि ट्रांजेक्शन पूर्ण करावे.

अशा पद्धतीने क्रेडिट कार्ड वरून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणे अगोदर या गोष्टींची काळजी घ्या

1- व्याजदर आणि शुल्क तपासा- अशा पद्धतीने पैसे ट्रान्सफर करताना तुम्हाला ट्रांजेक्शन शुल्क आणि व्याज द्यावे लागू शकते. बहुतेक क्रेडिट कार्ड प्रदाते अशा प्रकारे ट्रान्सफर केलेल्या रकमेच्या एक ते पाच टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क घेतात.

2- क्रेडिट लिमिट आणि उपलब्ध शिल्लक- तुमच्या क्रेडिट कार्डवर पुरेशा प्रमाणामध्ये क्रेडिट मर्यादा असणे गरजेचे आहे. यामध्ये कायम लक्षात ठेवावी की क्रेडिट कार्ड वरून जर पैसे ट्रान्सफर केले तर तुमचा उपलब्ध क्रेडिट लिमिट कमी होतो. तोपर्यंत तुम्ही कार्डवरून ट्रान्सफर केलेली रक्कम परतफेड करत नाही तोपर्यंत लिमिट हा कमीच असतो.

3- सुरक्षितता बाळगावी- तसेच अशा पद्धतीने पैसे ट्रान्सफर करताना खूप सुरक्षा पाळणे गरजेचे आहे. विश्वसनीय आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म असेल तरच अशा पद्धतीने पैसे ट्रान्सफर करावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe