ज्योतिष शास्त्रानुसार एखादया व्यक्तीचा जन्म ज्या तारखेला झालेला असतो ती तारीख आणि जन्मवेळ व जन्मवार इत्यादी वरून व्यक्तीची कुंडली बनवली जाते व या कुंडली वरून ग्रहांचा व्यक्तीच्या जीवनावर पडणारा चांगला किंवा वाईट प्रभाव सांगितला जातो.
ज्योतिषशास्त्र हे खूप महत्त्वाचे शास्त्र असून यामध्ये ग्रह तसेच नक्षत्र व त्यांची स्थिती यावरून व्यक्तीचे भविष्य किंवा त्याच्या संपूर्ण आयुष्याबद्दल महत्वाची माहिती मिळण्यास मदत होते. ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीला खूप महत्त्व असून आपल्याला माहिती आहे की अगदी लग्न जमवण्याच्या वेळी देखील कुंडली पाहिली जाते.
व्यक्तीच्या जीवनावर चंद्र तसेच मंगळ व गुरु या तीनही ग्रहांचा खूप मोठा प्रभाव असतो व त्यानंतर शनि देवाचा प्रभाव विशेष समजला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार बघितले तर शनि देव एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत नेमक्या कोणत्या घरात विराजमान आहे
त्यावरून त्या व्यक्तीचे आयुष्यातील यश किंवा त्याचे नसीब कसे असेल? हे कळायला मदत होते. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी किंवा आयुष्यामध्ये चांगला पैसा मिळावा याबाबतीत कुंडलीमध्ये शनिदेव नेमक्या कोणता घरात असावा हे देखील महत्त्वाचे आहे.
व्यक्तींच्या आयुष्यावर शनि देवाचा प्रभाव कसा असतो?
ज्योतिष शास्त्रानुसार असे म्हटले जाते की,शनी ग्रहाचा परिणाम हा व्यक्तीच्या वयाच्या 36 ते 42 वर्षाच्या दरम्यान दिसून येतो. शनी जर उत्तम म्हणजे शुभ असेल तर व्यक्तीला घर तसेच व्यवसाय व इतर क्षेत्रांमध्ये फायदा होतो.
हाच शनी जर अशुभ असेल तर मात्र त्याचे अनेक वाईट परिणाम भोगावे लागू शकतात. ज्योतिष शास्त्राच्या मते वयाच्या 34 वर्ष ते 36 वर्षापर्यंत जीवनावर बुध या ग्रहाचा प्रभाव दिसून येतो व हा ग्रह थेट व्यवसाय आणि नोकरीशी संबंधित आहे.
यशस्वी होण्यासाठी कुंडलीत शनी नेमका कोणत्या घरात विराजमान असावा?
असे म्हटले जाते की,व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी आठव्या स्थानी विराजमान असेल तर अशा लोकांसाठी खूप फायद्याचे ठरते. कुंडलीमध्ये शनि अष्टम म्हणजेच आठव्या स्थानी असणे म्हणजे आयुष्यात भरपूर यश मिळते असे म्हटले जाते.
ज्या लोकांच्या कुंडलीत आठव्या स्थानी शनि असतो अशा लोकांना आयुष्यामध्ये कितीही दुःख बघावे लागले असतील तरी त्यांची वयाच्या 35 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मात्र त्यांचे नशीब चमकायला लागते व यशाच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू होते व मोठ्या प्रमाणावर पैसा मिळायला लागतो.
कारण ज्योतिष शास्त्रानुसार बघितले तर कुंडली मधील जे काही आठवे घर असते ते खजिना तसेच खाण, संशोधन, वारसा तसेच रहस्य व इतर तंत्रे व आध्यात्मिक गोष्टींचे प्रतिनिधित्व करत असते व त्या दृष्टिकोनातून आठव्या घरात शनी विराजमान असणे हे महत्त्वाचे समजले जाते.
( टीप- वरील माहिती ही वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माहिती विषयी अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा दावा किंवा या माहितीचे समर्थन करत नाही.)