Numerology Secrets : अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग असून अंकशास्त्रात असे नमूद करण्यात आले आहे की, व्यक्तीच्या केवळ जन्म तारखे वरून त्याचे भूत, त्याचे वर्तमान आणि त्याचे भविष्य सांगितले जाऊ शकते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मूळांक निघतो आणि हाच मुळांक व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व तसेच त्याच्या भविष्याची माहिती देण्यासाठी उपयोगी ठरतो.
मुळांक हा एक ते नऊ दरम्यानचा अंक असतो. जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक निघतो. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 24 असेल तर अशा व्यक्तीचा मुळांक हा 2+4=6 राहणार आहे.
दरम्यान आज आपण पाच मूळांक असणाऱ्या लोकांबाबत माहिती पाहणार आहोत. अंकशास्त्रात पाच मुलांक असणारे लोक प्रचंड लाजाळू स्वभावाचे असतात असे म्हटले गेले आहे. अशा परिस्थितीत आता आपण पाच मूळांक असणाऱ्या लोकांची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
5 मुलांक कोणाचा असतो
कोणत्याही महिन्याच्या म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर या दरम्यान येणाऱ्या कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोकांचा मूळांक हा पाच असतो. ज्या लोकांचा मूळांक पाच आहे, अशा लोकांचा स्वामीग्रह बुध असतो.
कसा असतो 5 मुलांकाच्या व्यक्तीचा स्वभाव?
अंकशास्त्रानुसार, 5, 14 किंवा 23 जन्मतारखेची मुलं थोडी लाजाळू स्वभावाची असतात आणि त्यांना पटकन एखाद्यासमोर त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. या लोकांचा स्वामीग्रह बुध असतो. यामुळे या लोकांच्या जीवनावर बुध ग्रहाचा विशेष प्रभाव पाहायला मिळतो.
खरे तर या लोकांना कुणाची भीती वाटत नाही मात्र हे लोक भीतीपोटी नव्हे तर लाजाळूपणामुळे आपल्या मनातील गोष्टी आणि मनातील भावना कुणापुढेही सहजरीत्या प्रकट करत नाहीत. मात्र या लोकांचा एक मोठा गुण म्हणजे हे लोक कलेचे जाणकार असतात.
आणि या लोकांची कलेवर मोठ्या प्रमाणात श्रद्धा असते कलेवर हे लोक प्रेम करतात. हे लोक स्वतःही आर्टिस्ट असू शकतात. ही मुलं व्यावहारिक देखील असतात. त्याचबरोबर ते बुद्धिमान असतात आणि त्यांच्याकडे दूरदृष्टीही असते.
मूलांक 5 चे लोक पै पै करुन आपली संपत्ती जोडतात, तसेच ते चांगला बँक बॅलन्स देखील राखतात. हे लोक एक यशस्वी बिझनेसमॅन सुद्धा बनतात. हे लोक बिजनेस मध्ये उतरलेत तर अवघ्या काही वर्षातच हे लोक बिजनेस मध्ये चांगले नाव कमावतात.
बिजनेस मध्ये हे लोक नवीन कल्पना वापरतात आणि यामुळे हे लोक यशस्वी होतात. बिजनेस मधून प्रचंड पैसा कमवतात. यासोबतच हे लोक अगदीच मनीमाइंडेड स्वभावाचे असतात.