अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात यावी या मागणीसाठी भाजपच्या वतीने काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. आता याच धर्तीवर धार्मिक स्थळे उघडण्यात यावीत यासाठी जिल्ह्याचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी पुढाकार घेतला आहे.
व्यावसायिकांना सणासुदीच्या काळात चांगल्याप्रकारे व्यवसाय करता यावे यासाठी व्यावसायिकांना घालून दिलेल्या निर्बंधांची आवश्यकता नाही तसेच मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वार उघडावे अशी मागणी माजी खासदार दिलीप गांधी यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माजी खासदार गांधी यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव कमी होत असून तो महाराष्ट्रातही कमी होत आहे. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, सरकारी कर्मचारी, बँक कर्मचारी,
सफाई कर्मचारी व इतर सामाजिक संस्था रात्रं दिवस मेहनत घेत आहेत. सध्या संपूर्ण राज्यामध्ये अनलॉकडाऊन झालेले असून संपूर्णत: निर्बंध उठवलेले आहे. परंतू अहमदनगर जिल्ह्यामध्ये अद्याप पर्यत व्यावसायिकांना व्यावसाय करण्याकरिता अजूनही निर्बंध लादण्यात आले आहेत.
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने व्यावसायिकांना देण्यात आलेल्या निर्बंधकांची आता आवश्यकता भासत नाही. तरी संपूर्णत: निर्बंध काढण्यात यावे जेणेकरून व्यावसायिकांना सणासुदीच्या निमित्ताने चांगल्याप्रकारे व्यवसाय करता येईल. तसेच धार्मिक स्थळे उघडण्यात यावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved