Hyundai Creta EV:- ह्युंदाई ही एक प्रसिद्ध कार निर्माता कंपनी असून भारतीय कार बाजारपेठेमध्ये ह्युंदाईच्या अनेक कार असून ग्राहकांमध्ये त्या विशेष लोकप्रिय आहेत. या कंपनीची जर आपण क्रेटा ही एसयूव्ही विभागातील कार पाहिली तर ती सर्वाधिक विक्री होणारी कार असून भारतीय ग्राहकांमध्ये ती एक विशेष लोकप्रिय आहे.
आता कार प्रेमींसाठीच्या ह्युंदाई कंपनीच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी समोर आली असून क्रेटा ही आता इलेक्ट्रिक स्वरूपामध्ये लॉन्च होणार आहे. साधारणपणे 17 जानेवारी 2025 ही ह्युंदाई क्रेटा ईव्ही लॉन्च होण्याची तारीख असून अशा पद्धतीची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे.
परंतु नेमकी या कारची डिलिव्हरी केव्हा सुरू होईल आणि किती टोकन रकमेवर ही कार बुकिंग करता येईल याबाबत मात्र कंपनीने कुठलीही माहिती दिलेली नाही. जानेवारी 2025 मध्ये दिल्लीतील प्रगती मैदान येथे होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये ही कार प्रदर्शित केली जाईल अशी एक शक्यता आहे.
ह्युंदाई क्रेटा ईव्हीमध्ये मिळतील अनेक सेफ्टी फीचर्स
सध्या कार बाजारामध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये ह्युंदाई क्रेटा उपलब्ध असून एका आता लवकरच इलेक्ट्रिक स्वरूपात येणार आहे. तसे पाहायला गेले तर या कंपनीकडे कोना आणि Ioniq 5 यासारख्या इलेक्ट्रिक कार आहेत.
परंतु या कारची विक्री पेट्रोल इंजिन कारपेक्षा कमी आहे.आता ही नवीन इलेक्ट्रिक क्रेटा प्रीमियम सेगमेंटची असेल व त्यामध्ये प्रगत ड्रायव्हिंग साह्य प्रणालीचा वापर केलेला असणार आहे.
या नवीन इलेक्ट्रिक क्रेटाच्या फ्रंट ग्रीलला पूर्वीपेक्षा जास्त स्टायलिश बनवण्यात आले आहे व या कारच्या पुढील आणि मागच्या दोन्ही बंपरच्या आकारामध्ये बदल करण्यात येणार आहे. तसेच या इलेक्ट्रिक कारच्या डॅशबोर्डला आता स्पोर्टी लुक देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून यामध्ये 10.25 इंचाचा डिस्प्ले देण्यात येणार आहे.
याशिवाय आकार मध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो एसी तसेच मागील सीटवर चाइल्ड अँकरेज देण्यात आले आहे. ही कार 360 डिग्री कॅमेरा तसेच रिवर्स पार्किंग सेंसर आणि सहा एयरबॅग सारखे सुरक्षा वैशिष्ट्य देण्यात आले आहेत.
एकदा चार्ज केल्यावर देईल 450 ते 500 किलोमीटरची ड्रायव्हिंग रेंज
ह्युंदाई क्रेटा ईव्हीला 50kWh चा बॅटरी पॅक मिळेल व तो एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ही बॅटरी 450 ते 500 किलोमीटरचे ड्रायव्हिंग रेंज देईल. सध्या कंपनीने या कारची किंमत जाहीर केलेली नाही.
परंतु अंदाज आहे की ही कार साधारणपणे 18 लाख रुपये एक्स शोरूम सुरुवातीच्या किमतीमध्ये ऑफर केली जाऊ शकते. तसेच या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि स्टॅंडर्ड अलॉय व्हिल्स असतील. तसेच या कारमध्ये सनरूफ आणि ड्युअल कलरचा पर्याय मिळू शकतो.