Samsaptak Rajyog:- प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर ग्रह आणि नक्षत्रांचा खूप वेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो व जेव्हा एखादा ग्रह त्याचे राशी परिवर्तन करतो म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा अशा या ग्रहांच्या स्थितीचा देखील बारा राशींवर चांगला किंवा वाईट परिणाम होताना आपल्याला दिसून येतो.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे जेव्हा ग्रह अशा पद्धतीने आपली राशी बदलतात तेव्हा एखाद्या वेळेस एका राशीमध्ये दोन ग्रह एकत्र येतात किंवा समोरासमोर येतात व एक संयोग तयार होऊन त्यामुळे राजयोग निर्माण होतात.
अशा पद्धतीने तयार झालेले राजयोग हे काही राशींसाठी अशुभ तर काहीसाठी खूप शुभ असतात. अगदी याच पद्धतीने जर या नवीन वर्षाअगोदर जर आपण बघितले तर गुरु ग्रह आणि बुध हे दोन्ही ग्रह मिळून समसप्तक राजयोग तयार होत आहे. तयार होणाऱ्या या राजीयोगामुळे काही राशींना खूप मोठा फायदा होणार आहे.
जर सध्या आपण स्थिती बघितली तर गुरु हा मीन राशिमध्ये तिसऱ्या घरात आणि धनु राशिपासून जवळपास सहाव्या घरामध्ये विराजमान आहे आणि त्यासोबत बुध हा मिथुन राशि पासून आठव्या भावात आणि कन्या राशि पासून तिसऱ्या भावात स्थित आहे व अशा परिस्थितीमुळे हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर असताना समसप्तक योग तयार होत आहे.
समसप्तक राजयोगामुळे या राशींच्या आयुष्यात येईल पैसा व आर्थिक स्थिती होईल मजबूत
1- वृषभ राशी- समसप्तक राजयोगामुळे या राशीच्या लोकांना खूप मोठा फायदा होणार आहे व जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगले यश मिळू शकते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करण्याची संधी मिळतील आणि करिअरमधील समस्या देखील दूर होतील.
तसेच अनेक नवीन संधी उपलब्ध होतील व आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. अनेक कालावधीपासून काही कामे प्रलंबित किंवा अडकलेली असतील तर ते पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता.
2- कुंभ राशी- या राजयोगामुळे कुंभ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात चांगला बदल होण्याची शक्यता आहे व हा राजयोग या व्यक्तींसाठी खूप फायद्याचा आहे. करिअरमध्ये खूप मोठे यश मिळण्याची शक्यता आहे व जीवनात देखील आनंदी आनंद मिळेल.
काही कामे रखडलेली असतील तर त्यांना गती मिळेल व पैशांच्या बाबतीत परिस्थिती अतिशय चांगली राहील. या कालावधीत भाग्य पूर्णपणे साथ देईल व सट्टेबाजीच्या व्यवसायामधून भरपूर पैसे कमावण्याच्या संधी मिळतील.
3- वृश्चिक राशी- समसप्तक राजयोग या राशीसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. दीर्घ काळापासून प्रलंबित आणि रखडलेली कामे पूर्ण होतील व आर्थिक स्थिती चांगली राहील. गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला नफा मिळेल.
प्रेम जीवनामध्ये चांगल्या घटना घडतील व एकंदरीत प्रेम जीवन चांगले राहील आणि घरच्यांचे देखील सहकार्य मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्याकरिता हा कालावधी अनुकूल आहे.
4- सिंह राशी- समसप्तक राजयोग हा सिंह राशींच्या व्यक्तींसाठी खूप फलदायी ठरण्याची शक्यता आहे व यामुळे या व्यक्तींच्या जीवनामध्ये अनेक आनंदाच्या घटना घडू शकतात.
वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा मिळेल तसेच नोकरीत देखील अनेक नवीन संधी मिळू शकतील. नोकरीच्या ठिकाणी पगारवाढ तर होईलच. परंतु प्रमोशन होण्याची देखील दाट शक्यता आहे.