नवीन वर्ष 2025 चे सेलिब्रेशन शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी करायचे का? भारतातील ‘ही’ ठिकाणे आहेत अतिशय बेस्ट ऑप्शन

नवीन वर्षाच्या आगमन आता अवघे आठ ते नऊ दिवसांवर आले असून आता प्रत्येकाला या नवीन वर्षाच्या आगमनाची आणि स्वागताची उत्सुकता लागली आहे व त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे नवीन वर्षाकरिताचे सेलिब्रेशन करण्यासाठीच्या प्लॅनिंग देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये सुरू झालेले असतील व तसेच प्लॅनिंग आता मित्र किंवा कुटुंबासोबत बनवल्या देखील जात असतील.

Ajay Patil
Published:
gangtok

Top Destination For New Year Celebration:- नवीन वर्षाच्या आगमन आता अवघे आठ ते नऊ दिवसांवर आले असून आता प्रत्येकाला या नवीन वर्षाच्या आगमनाची आणि स्वागताची उत्सुकता लागली आहे व त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे नवीन वर्षाकरिताचे सेलिब्रेशन करण्यासाठीच्या प्लॅनिंग देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये सुरू झालेले असतील व तसेच प्लॅनिंग आता मित्र किंवा कुटुंबासोबत बनवल्या देखील जात असतील.

नवीन वर्षाच्या स्वागताचे प्लॅनिंग किंवा नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन करिता प्रामुख्याने गोवा सारख्या ठिकाणाला जास्त करून प्राधान्य दिले जाते व अशावेळी मात्र गोव्यासारख्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गर्दी जमा होते व बऱ्याचदा वाढणाऱ्या या गर्दीमुळे फिरण्याच्या आनंदावर मात्र विरजण पडते.

त्यामुळे तुम्हाला जर या नवीन वर्षाचे स्वागत आणि सेलिब्रेशन जर शांत अशा निसर्गरम्य ठिकाणी करायचा विचार असेल तर गोव्या ऐवजी या लेखात दिलेल्या काही ठिकाणांचा तुम्ही विचार करू शकतात. जी ठिकाणे अतिशय शांत आणि निसर्गरम्य असून तुमच्या कायम स्मरणात राहील असे सेलिब्रेशन तुम्ही करू शकतात.

या ठिकाणी भेट द्या आणि शांततेत व निसर्गरम्य ठिकाणी करा नवीन वर्षाचे सेलिब्रेशन

1- गंगटोक( सिक्कीम)- गंगटोक हे सिक्कीमच्या राजधानीचे शहर असून हे एक सुंदर असे हिल स्टेशन म्हणून देखील ओळखले जाते. जर आपण भारतातील इतर हिल स्टेशन बघितले तर त्या तुलनेत मात्र गंगटोक या ठिकाणी गर्दी खूप कमी असते व त्यामुळे तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी शांततेचा अनुभव घेता येतो.

तुम्ही जर गंगटोक या ठिकाणी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला तिबेटियन संस्कृती जवळून अनुभवता येते आणि त्या ठिकाणचे शांत वातावरण मनाला मोहून टाकते व त्यामुळेच हे उत्तम असे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. गंगटोक या ठिकाणी नाथू ला पास आणि चांगु तलाव या ठिकाणांवर नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करू शकतात.

2- वायनाड (केरळ)- वायनाड हे केरळ राज्यांमधील अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर असे ठिकाण असून हे अज्ञात ठिकाण असल्यामुळे फारसे पर्यटक या ठिकाणी गर्दी करत नाहीत.

वायनाड हे प्रामुख्याने त्या ठिकाणी असलेले हिरवेगार चहाच्या बागा आणि आणि सुंदर अशा तलावा करिता प्रामुख्याने प्रसिद्ध आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि नवीन वर्षाच्या कालावधीत फिरायला जाण्याकरिता हे चांगले ठिकाण आहे.

3- मलनाड( कर्नाटक)- कर्नाटक राज्यामधील मलनाड या ठिकाणी जर तुम्ही भेट दिली तर या ठिकाणाचे अतिशय शांत असे वातावरण तुम्हाला जीवनाची खरी अनुभूती देते. मलनाड येथे सुंदर असे धबधबे आणि हिरवेगार टेकड्यांचे सुंदर असे दृश्य पाहून मनाला मोठ्या प्रमाणावर भुरळ पडते.

तुम्हाला जर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जायचे असेल व तुम्हाला गर्दी हवी नसेल तर तुमच्याकरिता मलनाड अतिशय उत्तम असे स्थळ आहे. या ठिकाणी तुम्ही अक्सा धबधबा तसेच हगडी जंगल व त्यासोबत कुमार स्वामी हिल्स इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात.

4- झिरो व्हॅली( अरुणाचल प्रदेश)- तुम्हाला जर शांततेत फिरायचे असेल व शांततेमध्ये वेळ घालवायचा असेल तर झिरो व्हॅली हे अरुणाचल प्रदेश राज्यातील एक सुंदर असे पर्यटन स्थळ आहे.

या ठिकाणी देखील कमीत कमी गर्दी असते व त्यामुळे निसर्गप्रेमी आणि शांतता हवी असणाऱ्या पर्यटकांसाठी झिरो व्हॅली हे योग्य असे ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही पक्षी निरीक्षणापासून ट्रेकिंगचा देखील मोठ्या प्रमाणावर आनंद घेऊ शकतात व सांस्कृतिक अनुभव देखील मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe