सोने-चांदीच्या दरात आज झाला उलटफेर! सोन्याच्या किमती झाल्या कमी;आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र वाढ, वाचा महत्त्वाच्या शहरातील सोने-चांदीचे दर

देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्स वर सोन्याची किंमत 76,530 रुपये प्रतितळा तर चांदीची किंमत 89142 रुपये प्रतिकिलो इतकी आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील आज सोन्याचे बाजारभाव पाहिले तर 24 कॅरेट सोन्याचा दर 76690 रुपये प्रतितोळा म्हणजेच दहा ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 70299 रुपये प्रति तोळा इतकी आहे.

Ajay Patil
Published:
Gold-Silver Rate Today

Gold-Silver Rate Today:- आज जर आपण सराफा बाजारातील सोने आणि चांदीचे दर बघितले तर त्यामध्ये कालच्या तुलनेत काहीशी घसरण झाल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत प्रतितोळा साधारणपणे 900 रुपयांची वाढ झाली होती व याच कालावधीमध्ये चांदीने देखील वाढीच्या दिशेने वाटचाल केली होती

व चांदीच्या दरात १७५० रुपये प्रतिकिलो इतकी वाढ झालेली पाहायला मिळाली होती आंतरराष्ट्रीय बाजाराची जर आजची स्थिती बघितली तर साधारणपणे अमेरिकी कॉमेक्सवर सोन्याच्या किमती 2641.90 डॉलर प्रतिऔंस इतकी आहे तर चांदीची किंमत ३०.१९ डॉलर प्रति औंस इतकी आहे.

तसेच देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्स वर सोन्याची किंमत 76,530 रुपये प्रतितळा तर चांदीची किंमत 89142 रुपये प्रतिकिलो इतकी आहे.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील आज सोन्याचे बाजारभाव पाहिले तर 24 कॅरेट सोन्याचा दर 76690 रुपये प्रतितोळा म्हणजेच दहा ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 70299 रुपये प्रति तोळा इतकी आहे. तसेच चांदी प्रतिकिलो 89 हजार 130 रुपये प्रतिकिलो इतकी आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे 24 कॅरेटचे सोन्याचे दर

1- मुंबई- मुंबई येथे आज 24 कॅरेटच्या सोन्याचा प्रति दहा ग्राम सोन्याचा दर 76,540 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर 70162 रुपये इतका आहे. तर चांदी प्रतिकिलो 88 हजार 900 रुपये इतकी आहे.

2- पुणे- पुण्याला आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ७६५४० तर 22 कॅरेट सोन्याचा दर 70162 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा दर प्रतिकिलो 88 हजार 900 रुपये इतका आहे.

3- नागपूर- नागपूर येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम 76 हजार 540 तर 22 कॅरेट सोन्याचा दर 70162 रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे. तसेच चांदीचा दर प्रतिकिलो 88 हजार 900 रुपये इतका आहे.

4- कोल्हापूर- कोल्हापूर या ठिकाणी आज 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 76 हजार 540 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 70162 रुपये प्रतितोळा इतका आहे. तर चांदी प्रतिकिलो 88 हजार 900 रुपये इतकी आहे.

5- जळगाव- जळगाव येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,540 रुपये प्रतितोळा तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 70162 रुपये इतका आहे. तर चांदी प्रतिकिलो 88 हजार 900 रुपयांवर आहे.

6- ठाणे- ठाण्याला 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 76 हजार पाचशे चाळीस रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 70162 रुपये प्रतितोळा इतका आहे.तर चांदीचा प्रतिकिलो 88 हजार 900 रुपये इतका दर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe