ओलाने रिव्हील केली ओला S1 प्रो सोना एडिशन! या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये करण्यात आला आहे 24 कॅरेट सोन्याचा वापर,देईल 195 किमीची रेंज

इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपन्या जर आपण बघितल्या तर यामध्ये ओला इलेक्ट्रिक ही एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध अशी कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेक इलेक्ट्रिक स्कूटरचे मॉडेल लॉन्च करण्यात आलेले आहेत व ग्राहकांना देखील या ओला इलेक्ट्रिकचे अनेक मॉडेल पसंतीस उतरल्याचे आपल्याला दिसून येते.

Ajay Patil
Published:
ola s1 pro gold edition

Ola S1 Pro Gold Edition:- इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक कंपन्या जर आपण बघितल्या तर यामध्ये ओला इलेक्ट्रिक ही एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध अशी कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून अनेक इलेक्ट्रिक स्कूटरचे मॉडेल लॉन्च करण्यात आलेले आहेत व ग्राहकांना देखील या ओला इलेक्ट्रिकचे अनेक मॉडेल पसंतीस उतरल्याचे आपल्याला दिसून येते.

या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक ओला इलेक्ट्रिकने त्याच्या ईव्ही लाइनअपचे टॉप मॉडेल S1 प्रोचे गोल्ड लिमिटेड एडिशन उघड केली असून ही इलेक्ट्रिक स्कूटर S1 प्रोवर आधारित असून त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 24 कॅरेट गोल्ड प्लेटेड घटकांचा वापर करण्यात आला आहे.

कसे आहे ओलाच्या या इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन?
ओला S1 प्रो सोना लिमिटेड एडिशन या इलेक्ट्रिक स्कूटरचे जर डिझाईन बघितले तर यामध्ये गोल्डन कलर व पर्ल व्हाईट कलर सह ड्युअल टोन डिझाईन थीम मिळते. तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरला बेज रंगाच्या नप्पा लेदरपासून बनवलेले प्रीमियम सीट देण्यात आले आहेत व त्याला जरी धागा वापरण्यात आला आहे व सोनेरी धाग्याने ते विणलेले आहे.

तसेच इलेक्ट्रिक स्कूटरचे मुख्य बॉडी जी आहे ती पॅनल स्क्रीन पांढऱ्या रंगात, हेडलाईट आच्छादन आणि समोरचा मडगार्ड गेरू बेज रंगात पूर्ण करण्यात आला आहे. यासोबतच टेलिस्कोपिक फोर्क,स्विंगआर्म, रियर मोनो शॉक स्प्रिंग आणि अलॉय व्हील सोनेरी रंगात आहे व यात MoveOS सॉफ्टवेअर तसेच गोल्ड थीम असलेला युजर इंटरफेस आणि सानुकूलित MoveOS डॅशबोर्ड देण्यात आला आहे.

तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरचे मिरर हँडल, ब्रेक लिव्हर, साईड स्टॅन्ड, बिलियन फुटरेस्ट आणि ग्रेबरेल हे 24 कॅरेट कोटिंगसह आहेत. याशिवाय यामध्ये तांत्रिक स्वरूपाचे कुठल्याही पद्धतीचे बदल करण्यात आलेले नाहीत. तसेच पूर्वीप्रमाणेच ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 195 किमी पर्यंत आयडीसी रेंज देण्यास सक्षम आहे.

कंपनीच्या ‘या’ मोहिमेत जिंकता येईल ओला S1 प्रो गोल्ड इलेक्ट्रिक स्कूटर
ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ओला इलेक्ट्रिक या कंपनीने एक उत्सव मोहीम सुरू केली असून ती 25 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून काही निवडक ग्राहकांना S1 प्रो ची गोल्ड लिमिटेड एडिशन जिकण्याची आकर्षक संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या मोहिमेमध्ये जे सहभागी होतील त्यांना ओला S1 सह एक पोस्ट करावी लागेल किंवा कंपनीचे जे काही स्टोअर आहेत त्याच्या बाहेर चित्र किंवा सेल्फी क्लिक करावी लागेल आणि #OlaSonaContest सह टॅग करावे लागेल. या मोहिमेत जे सहभागी होतील त्यांना 25 डिसेंबर रोजी स्क्रॅचद्वारे स्कूटर जिंकण्याची संधी मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe