Pushpa 2 Cinema:- अठरा दिवसांपूर्वी रिलीज झालेला साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 या सिनेमाने बॉक्स ऑफिस आणि सिनेमागृहांमध्ये प्रचंड धुमाकूळ घातला असून जेव्हापासून हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हापासून याने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड्स मोडले आहेत.
दिग्दर्शक सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या 2021 च्या पुष्पा द राईज चा हा दुसरा भाग असून पुष्पा 2 द रुलने आज 18 व्या दिवशी देशातील सर्वाधिक कमाई करणारा बाहुबली 2 या चित्रपटाचा विक्रम मोडला.
या चित्रपटाने सतराव्या दिवशी 1029.9 कोटी रुपयांची कमाई केली होती. भारतातील टॉप 10 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत प्रभासचा बाहुबली 2 हा 1030.42 कोटींची कमाई करून पहिल्या क्रमांकावर होता.
परंतु आता पुष्पा 2 ला फक्त 52 लाखांची कमाई करून बाहुबलीला मागे टाकायचे होते व आता या सिनेमाने ती कामगिरी केली आहे. त्यामुळे आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाने प्रथम क्रमांक पटकावला आहे व लवकरच हा सिनेमा अकराशे कोटींचा देखील टप्पा पार करण्याची स्थिती दिसून येत आहे.
या सगळ्या कमाईच्या धामधुमीत मात्र पुष्पा 2 या सिनेमाच्या चाहत्यांसाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे व ही बातमी म्हणजे पुष्पा 2 या चित्रपटाचा कालावधी आणखी वीस मिनिटांनी वाढवण्यात येणार असून लवकरच हा सिनेमा नव्या फुटेजसह सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.
‘पुष्पा 2’ मध्ये आणखी वाढवली 20 मिनिट; नव्या फुटेजसह लवकरच होणार रिलीज
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालणारा आणि दोन डिसेंबर मध्ये सिनेमागृहामध्ये रिलीज झालेला पुष्पा 2 सिनेमा बघायला प्रेक्षकांची हाउसफुल गर्दी पाहायला मिळाली.
अशातच आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे व ती म्हणजे पुष्पा 2 मध्ये आणखी वीस मिनिट अधिक केली जाणार असून नव्या फुटेजसह हा चित्रपट लवकरच सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटांमध्ये आणखी वीस मिनिट वाढणार असून तब्बल पावणे चार तास म्हणजेच 3 तास 40 मिनिटे लांबीचा हा चित्रपट आता प्रेक्षकांना पहायची संधी मिळणार आहे.या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन व रश्मीका मंदाना इत्यादी स्टार कास्ट आहे.